🔥साहुर सर्कल मध्ये गारांचा पाऊस संत्रा मोसंबी पिकांची झाली नासाडी.
साहुर,आष्टी -/ आष्टी तालुक्यातील साहुर सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाल्याने संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला असून सर्व फळबागांवर गारांचा वर्षाव झाला असून मोठ्या प्रमाणावर पिकांची नासाडी झाली आहे अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आकाशात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट पाहुण सर्वांना आचार्याचा धक्काच बसला एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे शासनामार्फत मोठ्या मोठ्या योजनांचा गाजावाजा होत असतो परंतु निष्क्रिय कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभही होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसामोर जगावं की मरावं? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांचा वर्षाव झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या सर्व नासाडीचे पंचनामे करून त्वरित मदत करण्याची मागणी शेतकरी करीत आहे हे विशेष