प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांगाचे दैवत आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…..

0

सेलू -/ येथील प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आज ता. ५ जुलै रोजी दिव्यांगाचे दैवत आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी दिव्यांग बालगोपालांना मान्यवरांच्या हस्ते वस्त्रांचे वितरण करण्यात आले.सेलू येथील प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यालयात आज तालुकाध्यक्ष सुनिल मिश्रा यांच्या संकल्पनेतून दिव्यांगाचे दैवत आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल लुंगे तर प्रमुख अतिथी म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रवक्ता संजय धोंगडे, तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल लुंगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात माध्यम प्रतिनिधी म्हणून दिव्यांगाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही खंबीरपणे सदैव पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी लक्ष गौतम, तुषार ढोडरे, विराज गोंडाणे आदी दिव्यांग बालकांना वस्त्रांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल मिश्रा, गजानन वांढरे, विजय वानखेडे, ललित शेंडे, उमेश पराते, हैदर, दिनेश कुंभलकर, कुणाल कुंभारे, दिपमाला पारसे आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

सचिन धानकुटे साहसिक news -/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!