जर्जर झालेल्या पुलामुळे अपघाताची शक्यता?…

0

🔥बसस्थानकासमोरील अनेक दिवसापासून जर्जर अवस्थेत….

देवळी -/ बसस्थानक समोरच्या मुख्य मार्गावर असलेला पूल मागील अनेक दिवसापासून जर्जर अवस्थेत दिसून येत आहे. या पुलावरून संपूर्ण रेती गिट्टी निघून गेली असून या पुलाआतील सळाखी उघड्या पडल्या आहे. या पुलावरून जर एखादी जड वाहन गेले तर पुल तुटून तिथे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बसस्थानकासमोरील हा मुख्य मार्ग शहरात येण्यासाठी प्रत्येक वाहन तिथूनच ये जा करीत असते. पावसाळ्यामध्ये येथे पाणी सुद्धा साचतो आणि या पुलाच्या कडेला लागून देवळीतील प्रसिद्ध हॉटेल बिकानेर मिठाई सेंटर आहे त्यामुळे तेथे दुचाकी व चार चाकी वाहने उभी असतात. तरीही देवळी नगरपरिषद प्रशासनाणे याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. यापूर्वीही अनेक वेळा हा पूल क्षतिग्रस्त झाला आणि जड वाहने सुद्धा अटकून किरकोळ अपघात झालेले आहे. आणि पुलाच्या बाजूला असलेली सुरक्षा भिंत हे सुद्धा क्षत्तिग्रस्त झालेली आहे.
नगरपरिषद प्रशासनाने त्वरित या मुख्य रस्त्यावरील पूलाकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी तिथे जर अपघात झाला तर नगरपरिषद प्रशासन जबाबदार घेईल का? असे प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहे. तरी या समस्येकडे नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. या पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी देवळीकर जनता करीत आहे.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!