🔥हाच तो बाभुळगाव तालुक्यात चमेडीचोर लुच्छा सतिष मानलवारची संघटित गुन्हेगारी; गंभीर गुन्ह्यांची मालिका, पोलिसांत तक्रारी दाखल!
🔥राजकीय वरदहस्तातून सतिष मानलवारचा वाढता उपद्रव; पत्रकार आणि नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या, कारवाईची मागणी!
यवतमाळ -/ बाभुळगाव तालुक्यात संघटित गुन्हेगारी आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणारा भाजप जिल्हा सचिव सतिष मानलवार याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून सर्वसामान्यांचे जीवन असुरक्षित झाले आहे. खुनाचा प्रयत्न, महिलांवर अत्याचार, शेतकरी व बँकांची फसवणूक यांसारखे एकापाठोपाठ एक गंभीर आरोप उघडकीस येत आहेत. कृष्णापूर येथे एका कुटुंबावर टोळीसह प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मानलवारसह ५४ जणांवर गुन्हे दाखल असतानाही त्याची दहशत कमी झालेली नाही. पत्रकारांना उघडपणे खुनाची धमकी देणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकावणे यामुळे संतापाची लाट पसरली असून, या उपद्रवी टोळीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी तीव्र होत आहे. बाभुळगाव तालुका व परिसरात सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि राजकीय अरेरावीचा कळस पाहायला मिळत आहे. भाजप जिल्हा सचिव सतिष मानलवार याच्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्ता आणि संपत्तीच्या बळावर टोळी तयार करून संघटित गुन्हेगारी चालविणे, विरोधकांना जिवे मारण्याची धमकी देणे आणि दुर्बल घटकांवर अन्याय करणे या घटनांमुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
तालुक्यातील कृष्णापूर येथे डोफे कुटुंबावर संघटितपणे प्राणघातक हल्ला करून त्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या भीषण हल्ल्याप्रकरणी बाभुळगाव पोलीस ठाण्यात सतिष मानलवार याच्यासह ५४ जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. एका संपूर्ण कुटुंबावर अशा प्रकारे टोळीच्या साहाय्याने हल्ला करण्याची हिंमत कशी झाली, यावर स्थानिक नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
केवळ जमिनीचे आणि वर्चस्वाचे वादच नव्हे, तर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही मानलवारचे नाव पुढे येत असल्याचा आरोप स्थानिकांमधून केला जात आहे. तालुक्यातील एका तरुणीला फसवून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा प्रकार समोर आला असून, नुकतीच आणखी एका महिलेवर अत्याचार झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकारांमुळे महिला वर्गामध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
सतिष मानलवार याने आर्थिक फसवणुकीच्या क्षेत्रातही हातपाय पसरल्याचे आरोप आहेत. दुग्ध व्यवसाय (डेअरी फार्म) सुरू करण्याच्या बहाण्याने स्टेट बँकेकडून २५ लाख रुपयांचे मुद्रा कर्ज घेऊन शासनाची व बँकेची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याव्यतिरिक्त, बाभुळगाव येथे कृषी केंद्र उघडून त्या आडून परिसरातील गरीब आणि अज्ञानी शेतकऱ्यांची लूटमार केली जात असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. एकीकडे शासकीय योजनांचा गैरवापर आणि दुसरीकडे बळीराजाची फसवणूक यामुळे ग्रामीण जनतेत तीव्र रोष आहे.
‘दै. साहसिक’चे जिल्हा प्रतिनिधी गणेश खडसे हे बाभुळगाव दौऱ्यावर आले असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जहीर भाई यांच्याशी झालेल्या चर्चेत धक्कादायक माहिती समोर आली. जहीर भाई यांच्या म्हणण्यानुसार, सतिष मानलवार हा उघडपणे ‘गणेश खडसे यांचा आजवर खून झाला असता’ अशी बतावणी करत फिरत आहे. तसेच खडसे हे यवतमाळ कार्यालयाकडे जात असताना मानलवारच्या गुंडांकडून त्यांच्यावर हल्ला होण्याची दाट शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या धमक्या केवळ पत्रकारापुरत्या मर्यादित नसून त्यांच्या पत्नी व मुलांच्या जीवितालाही मानलवार टोळीकडून धोका निर्माण झाला असल्याचे जहीर भाई यांनी नमूद केले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबीयांवर हल्ल्याची भाषा वापरली जात असल्याने माध्यम वर्तुळात तसेच सामाजिक संघटनांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यात गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे पसरवून सर्वसामान्यांवर आणि पत्रकारांवर दहशत माजविणाऱ्या सतिष मानलवार याचा पोलीस प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. जर प्रशासनाने राजकीय दबावाखाली येऊन दुर्लक्ष केले, तर तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय आणि शेतकरी संघटना एकत्र येऊन या गुंडगिरीविरोधात तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.(क्रमशः)