भाजप चा यवतमाळ जिल्हा सचिव चमडीचोर सतीश उर्फ लुच्छा मानलवार याचे वर एक्ट्रोसिटी चा गुन्हा दाखल करा: समा जसेवक चंदन हातगले यांची मागणी

0

🔥हाच तो यवतमाळ जिल्हा भाजपा सचिव सतीश उर्फ लुच्चा मानलवार या चमडीचोर ने दलित समजा चे घरावर केला जीवेघेने हमला

🔥दलीत पत्रकार रत्नपाल डोफेंच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करणार्या भाजप जिल्हा सचिव चमडीचोर लुच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ ची वाढीव कलम दाखल करा 

🔥सत्य मांडणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न: डोफे कुटुंबावरील रक्तरंजित हल्ल्याने संतापाची लाट, गुन्हेगारांवर तत्काळ अटकेची मागणी

​यवतमाळ -/ ​लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर आणि अन्यायाविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर पुन्हा एकदा भ्याड व रक्तरंजित हल्ल्याचे भीषण सावट पसरले आहे. बाभूळगाव तालुक्यातील कृष्णापूर येथे पत्रकार तथा आरटीआय कार्यकर्ते रत्नपाल डोफे आणि त्यांच्या निरपराध कुटुंबावर झालेला जीवघेणा हल्ला म्हणजे कायद्याच्या राज्याला थेट दिलेले आव्हान आहे. सत्ता आणि राजकीय वरदहस्ताच्या जोरावर सत्य दडपण्याचा, आवाज चिरडण्याचा हा विकृत प्रयत्न असून या प्रकरणातील भाजप जिल्हा सचिव सतीश मालनवार यांच्यासह सर्व संबंधितांवर ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करून गजाआड करावे, या मागणीसाठी जिल्ह्यात संतापाचा तीव्र उद्रेक झाला आहे.

समाजातील गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लेखणीच्या आणि माहिती अधिकाराच्या माध्यमातून सातत्याने लढा देणारे पत्रकार रत्नपाल डोफे यांच्या कुटुंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कृष्णापूर (ता. बाभूळगाव) येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून या भ्याड हल्ल्याचा चौफेर तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

स्थानिक पातळीवर जनतेच्या हितासाठी आवाज उठवणे, प्रशासकीय गैरकारभाराची माहिती अधिकाराच्या माध्यमातून पोलखोल करणे यामुळे पत्रकार रत्नपाल डोफे काही समाजकंटकांच्या डोळ्यात सलत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूर्ववैमनस्य आणि सत्य उघडकीस आणल्याच्या रागातून आरोपींनी डोफे यांच्या घराला आणि कुटुंबाला लक्ष्य केले. अचानक करण्यात आलेल्या या रक्तरंजित हल्ल्यात डोफे कुटुंबातील सदस्य गंभीररीत्या जखमी झाले आहेत. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय थेट घरात घुसून अशा प्रकारे दहशत माजवणे ही स्थानिक कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणारी बाब ठरली आहे. या संपूर्ण हल्ल्यामागे आणि षडयंत्रामागे भाजपचे जिल्हा सचिव सतीश मालनवार यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप पीडित पक्ष व सामाजिक संघटनांनी केला आहे. राजकीय प्रभावाचा गैरवापर करून सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रातील घटकांना लक्ष्य केले जात असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ किरकोळ गुन्ह्यांची नोंद न करता, या प्रकरणात जातीवाचक द्वेष आणि दडपशाहीचा पैलू स्पष्ट दिसत असल्याने सतीश मालनवार यांच्याविरुद्ध ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा’ म्हणजेच ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी आता पुढे आली आहे.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच विविध पत्रकार संघटना, आरटीआय कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध नोंदवत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. “सत्य मांडणाऱ्या पत्रकारांच्या कुटुंबाला जर अशा प्रकारे भयभीत केले जात असेल, तर लोकशाही आणि संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित कसे राहणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर ताशेरे ओढले जात आहेत.

या प्रकरणातील वाढता तणाव पाहता विविध सामाजिक संस्था आणि पत्रकारांनी प्रशासनापुढे ठोस मागण्या मांडल्या आहेत:

१. निष्पक्ष व पारदर्शक चौकशी: डोफे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याची सखोल आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.

२. सतीश मालनवार यांच्यावर कारवाई: राजकीय पदाचा आडोसा घेणाऱ्या भाजप जिल्हा सचिव सतीश मालनवार यांच्या भूमिकेची कायदेशीर चौकशी करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा.

३. दोषींना तत्काळ अटक: या हल्ल्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्व गुन्हेगारांवर कठोर कलमांन्वये कारवाई करून त्यांना तात्काळ गजाआड करावे.

४. पीडित कुटुंबास पोलीस संरक्षण: डोफे कुटुंबाचा जीव धोक्यात असल्याने त्यांना तत्काळ चोख पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे आणि संपूर्ण न्याय मिळेपर्यंत प्रकरणाचा पाठपुरावा जलदगती न्यायालयात करावा.

🔥​प्रशासनाकडून कारवाईची प्रतीक्षा

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपास सुरू केला असला, तरी राजकीय वरदहस्तामुळे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका जनतेत उपस्थित केली जात आहे. जर या प्रकरणात पोलिसांनी निष्पक्ष पावले उचलली नाहीत आणि मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे. पत्रकारांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका घेऊन आता संपूर्ण समाज डोफे कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!