बुटीबोरी MIDC मध्ये सुरक्षा रक्षकांचे अनेक महिन्यांचे वेतन थकीत ! मुख्यमंत्री सहसचिवकडे तक्रार, चौकशीची मागणी…

0

🔥बुटीबोरी MIDC मध्ये सुरक्षा रक्षकांचे अनेक महिन्यांचे वेतन थकीत ! मुख्यमंत्री सहसचिवकडे तक्रार, चौकशीची मागणी.

 नागपूर,बुटीबोरी -/ MIDC येथील Reliance, Vidarbha Industries Power Ltd. (प्लांट क्र. D३) येथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे अनेक महिन्यांपासून वेतन थकवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुरक्षा रक्षक देवानंद नामदेव चकोले (रा. कान्होलीबारा, ता. हिंगणा) यांनी बाधित कर्मचाऱ्यांसह मा. आमदार समीर मेघे (हिंगणा विधानसभा) व मुख्यमंत्री सहसचिव आशा पठाण यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत तातडीची चौकशी व कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार संबंधित उद्योगामध्ये Intelligence Security Force, Prime Guard, New J.B Enterprises, BIS Security या कंत्राटी एजन्सीद्वारे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, वेतन वेळेवर न मिळणे, तसेच PF कपात करूनही जमा/हस्तांतरणात अनियमितता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वेतन थकवल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर घरभाडे, मुलांचे शिक्षण, औषधोपचार व दैनंदिन खर्चाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित प्रकरणात तातडीने वेतन अदा करणे, PF रक्कम जमा करून लेखी पुरावा देणे आणि दोषींवर कामगार कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कार्यवाही न झाल्यास कामगार आयुक्त, PF विभाग, जिल्हाधिकारी, पोलीस विभाग तसेच न्यायालयीन मार्गाने दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे.

     गजानन ढाकूलकर               साहसिक News-/24 नागपूर,बुटीबोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!