माणिकवाडा ते तारासावंगा रस्त्याचे खडीकरण निकुस्ट दर्जाचेव,नविभागाची परवानगी न घेताच सुरु आहे खडीकरणं…

0

🔥माणिकवाडा ते तारासावंगा रस्त्याचे खडीकरण निकुस्ट दर्जाचेव,नविभागाची परवानगी न घेताच सुरु आहे खडीकरणं.

आष्टी शहिद -/ आष्टी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या तारासावंगा ते माणिकवाडा रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या निधीतून साठ लक्ष रुपये खर्च करून रस्त्याचे खाडिकरण करण्यात येत आहे. मात्र या कामात जुना डांबर रस्ता न खोदताच वरून गिट्टी टाकून रस्ता सुरळीत करण्याचे निकुस्ट दर्जाचे काम करण्यात येत आहे. गिट्टी टाकण्यासाठी वन विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही. गिट्टी टाकून करण्यात येणारा रस्ता हा निकुस्ट दर्जाचा होत आहे अशी गावकर्यांची ओरड आहे.
सविस्तर असे कि,
आष्टी तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या तारा सावंगा गावात जाण्यासाठी माणिकवाडा वरून चार किलोमीटर चा रस्ता आहे. हा रस्ता गिट्टी उखाडल्याने वाहतुकीस अयोग्य होता. रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून येथील नागरिकांनी अनेकदा जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन दिले होते. त्याच निवेदनाची दखल घेतल्यावर माणिकवाडा ते तारासावंगा या मार्गकारिता 1700मीटर करिता साठ लाखाचा निधी मंजूर असून या मंजूर निधीचे काम सद्या सुरु आहे. रस्त्यावर गिट्टी टाकून त्यावर बारीक चुरी टाकण्यात येत आहे. मात्र जुना डांबर रस्ता खोडला जात नाही. कोणतेही खोदकाम न करता सुरु असलेल्या गिट्टी करणाच्या कामात बोगस काम होत आहे हे गावकर्यांच्या लक्षत आल्यावर गावाकर्यांनी जिल्हा परीशद अभियंता दिवटे यांना फोन वर माहिती दिली. अभियंता दिवटे यांनी तात्काळ घटना स्तळं गाठले व कामाची पाहणी केली तेव्हा सुरु असणारे काम निकुस्ट दर्जाचे आहे अशी खात्री करून घेतली. तारासावंगा येथील गावकर्यांनी अभियंता दिवटे यांच्या समोर समस्याचा पाढा वाचला तेव्हा अभियंता दिवटे व खरबडे यांनी सुरु असलेले काम बोगस आहे याची माहिती दिली. कामात सुधारणा करावी म्हणून कंत्राट दाराला तशा सूचना केल्या असल्याचे अभियंता यांनी सांगितले. डांबर रस्त्याला कोणतेही खोदकाम न करता गिट्टी टाकून रस्ता निर्माण करण्यात येत असताना डांबराचा थांग पत्ता नाही. गिट्टी टाकून त्यावर चुरी टाकली असताना मागून जड वाहन गेल्यावर गिट्टी उघडी पडत आहे. गिट्टी उघडी पडल्यामुळे रस्त्याचे काम निकुस्ट दर्जाचे होत आहे. अशी गावाकऱ्यांची ओरड आहे.

प्रतिक्रिया -/ श्री. धुर्वे वनपाल माणिकवाडा
माणिकवडा ते तारा सावंगा रस्त्यावर लागून वनविभाग आहे. वनविभागाची कोणतीही परवानगी घेतली नसताना गिट्टी टाकली कशी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळविली आहे. चौकशी केल्यावर माहिती देण्यात येईल. परवानगी नसेल तर कार्यवाही होणारच.

नरेश भार्गव साहसिक News-/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!