यवतमाळच्या सराफा बाजारात कोट्यवधींच्या चोरीच्या सोन्याची विल्हेवाट

0

🔥हाच तो सचिन जाधव सोने गलाइ वाला नोकर बनला चोरीचे सोने गलाइ करून करोडपती

🔥यवतमाळच्या सराफा बाजारात कोट्यवधींच्या चोरीच्या सोन्याची विल्हेवाट

🔥हेच ते प्रभू मस्के ज्वलर्स या दुकानातून चोरी चे सोने ची होतात तस्करी

🔥‘महालक्ष्मी रिफाईन’च्या आडून सचिन जाधव, प्रभू मस्के टोळीचा काळाबाजार उघड

🔥​१० हजारांचा नोकर झाला कोट्यधीश! यवतमाळात सचिन जाधव व प्रभू मस्के यांच्या माध्यमातून अवैध सोन्याचे साम्राज्य

🔥आयकर विभाग व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

यवतमाळ -/ ​यवतमाळमधील सराफा बाजारात चोरीचे सोने वितळवून (गलाई) अल्पावधीत कोट्यवधींची बेनामी माया जमवणाऱ्या आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अवघ्या काही वर्षांपूर्वी महिना १० ते १५ हजार रुपयांच्या किरकोळ पगारावर काम करणारा सचिन जाधव आणि त्याचा साथीदार प्रभू मस्के यांनी ‘महालक्ष्मी रिफाईन’च्या आडून समांतर काळी अर्थव्यवस्था निर्माण केल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. नागपुरातील एका सराफाला उद्ध्वस्त करण्यापासून ते यवतमाळात दररोज दोन किलो सोन्याची अवैध उलाढाल करण्यापर्यंत या टोळीचे जाळे पसरले असून, स्थानिक पोलिसांचे अभय असल्याच्या उघड दाव्यांमुळे आता आयकर विभाग, ईडी आणि विशेष तपास पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

यवतमाळच्या गजबजलेल्या सराफा लाईनमध्ये सध्या एका धक्कादायक आणि संतापजनक आर्थिक गुन्हेगारी प्रकरणाने संपूर्ण व्यापारी वर्गात खळबळ उडवून दिली आहे. सोन्याची गलाई (सोने वितळवणे) करण्याच्या नावाखाली उघडपणे चोरीचे दागिने खपवणे, बनावट पावतींशिवाय किलोच्या हिशोबात सोन्याची तस्करी करणे आणि अल्पावधीत कोट्यवधींची रोख मालमत्ता गोळा करणे, असा गोरखधंदा ‘महालक्ष्मी रिफाईन’ नावाच्या दुकानातून बेधडक सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या काळ्या साम्राज्याची सूत्रे सचिन जाधव आणि त्याचा पडद्यामागचा प्रमुख सूत्रधार प्रभू मस्के यांच्या हातात असल्याचे सांगितले जात आहे.

​काही वर्षांपूर्वी सचिन जाधव हा यवतमाळ येथील मुरलीभाऊ यांच्याकडे सोन्याची गलाई करण्याचे काम शिकण्यासाठी अवघ्या १० ते १५ हजार रुपयांच्या नाममात्र पगारावर काम करत होता. तिथे कामाची पद्धत आणि सोन्याच्या व्यवहारातील बारकावे आत्मसात केल्यानंतर सचिनने अचानक नोकरी सोडली आणि प्रभू मस्के याच्या साथीने स्वतःचे स्वतंत्र दुकान थाटले. ​या भागीदारीनंतर सचिन जाधव याच्या आर्थिक परिस्थितीत झालेला बदल थक्क करणारा आणि तपास यंत्रणांचे डोळे उघडणारा आहे. अवघ्या काही वर्षांत १५ ते २० किलो चोरीच्या आणि संशयास्पद सोन्याची परस्पर विल्हेवाट लावून त्याने अफाट संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला जात आहे. वैध व्यवसायातून वर्षांनुवर्षे कष्टाने न मिळणारी संपत्ती अवघ्या तीन-चार वर्षांत कशी उभी राहिली? असा संतप्त सवाल यवतमाळचे प्रामाणिक सराफा व्यावसायिक विचारत आहेत. ​सचिन जाधव आणि प्रभू मस्के यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा विस्तार केवळ यवतमाळपुरता मर्यादित नसून नागपूरपर्यंत पसरल्याचे उघडकीस आले आहे. नागपूर येथील एका निष्पाप आणि प्रतिष्ठित सोने गलाई करणाऱ्या कारागिराला या दोघांनी विश्वासात घेऊन कोट्यवधींचा गंडा घातला. इतकेच नव्हे, तर त्याच्या दुकानावर अक्षरशः गुंडगिरी करून ठिय्या मांडला आणि दरोडासदृश परिस्थिती निर्माण करून त्या व्यापाऱ्याला पूर्णपणे दिवाळखोरीत ढकलले. अखेर वैतागून आणि दहशतीखाली येऊन त्या व्यापाऱ्याला आपले दुकान कवडीमोल भावात विकून मूळ गावी पलायन करावे लागले. नागपुरात विविध ठिकाणांहून चोरीला आलेल्या दागिन्यांची गलाई करून ते इतर जिल्ह्यांत अवैध मार्गाने विकण्याची साखळी या दोघांनी उभारल्याचे सांगितले जाते.

​सचिन जाधव याने अल्पावधीत उभी केलेली मालमत्ता पूर्णपणे काळ्या पैशातून आणि ‘कॅश’ व्यवहारांतून जमवल्याचे स्पष्ट होत आहे:

​वर्ष २०२१ स्वतःच्या मराठवाडा येथील मूळ गावी सुमारे ४० लाख रुपयांचे आलिशान बांधकाम पूर्णपणे रोख रक्कम मोजून केले.

​वर्ष २०२२: यवतमाळ शहरातील गणपती मंदिराजवळ सुमारे ४५ लाख रुपयांचा फ्लॅट रोख पैशांच्या जोरावर खरेदी केला.

​वर्ष २०२५: अंदाजे १२ लाख रुपयांची नवीन बोलेरो गाडी थेट रोख रकमेत खरेदी केली.

​वर्ष २०२६: सोन्याची शुद्धता आणि अवैध धातू तपासण्यासाठी लागणारे अत्याधुनिक मशीन तब्बल ३५ लाख रुपये रोख देऊन विकत घेतले.

​दागिन्यांचे प्रदर्शन: स्वतःच्या अंगावर सुमारे अर्धा किलोपेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने घालून हा इसम सराफा बाजारात उघडपणे वावरत आहे. ​याशिवाय अनेक बेनामी जमिनी, भूखंड आणि गुप्त लॉकरमध्ये दडवलेली माया अद्याप समोर येणे बाकी आहे.

​सराफा लाईन येथील ‘महालक्ष्मी रिफाईन’ हे दुकान कायदेशीर कामासाठी नसून चोरीच्या सोन्यावर प्रक्रिया करण्याचा सुरक्षित अड्डा बनले आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुकानातून दररोज सरासरी २ किलो सोन्याची अवैध हाताळणी होते. इतकेच नव्हे, तर सचिन जाधव याच्याकडे तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांचे सोने कोणत्याही अधिकृत नोंदणीशिवाय अवैध पद्धतीने गहाण ठेवण्यात आले आहे. प्रभू मस्के हा प्रत्येक दोन दिवसांनी या दुकानात ठाण मांडून बसतो आणि पुढील आर्थिक व्यवहारांचे नियोजन करतो.

​सर्वात संतापजनक बाब म्हणजे, टोळीचा म्होरक्या सचिन जाधव सराफा बाजारात उघडपणे फुशारक्या मारत सांगतो की, “स्थानिक पोलिसांना आमचा नियमित हप्ता पोहोचतो, त्यामुळे आमच्यावर कधीही कारवाई होणार नाही.”​त्याच्या या विधानाने यवतमाळ पोलीस प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आयकर विभागाला आणि जीएसटी विभागाला कोट्यवधींच्या या सोन्याच्या गलाईची साधी भणकही नाही. त्यामुळे ही टोळी आता पूर्णपणे निर्ढावली आहे. या संपूर्ण रॅकेटची वरिष्ठ पातळीवरून एसआयटी आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ED) सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने देशद्रोहासारखा गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!