सततधार पावसामुळे पिकांचे झाले नुकसान.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रा व कृषिमंत्रीकडे मागणी.
हिंगणघाट -/मागीन ७ दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असुन पुर येवुन शेतीपिकांचे खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन सरकारने सर्व्हे करून आर्थिक मदत देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषी मंत्री तसेच महसूल मंत्री यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यातील मागील ०७ दिवसापासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असुन पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतविकांचे खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन पिके निस्तनाभुत होवुन जळली आहे. त्याच प्रमाणे सर्व सामान्यांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे.
वर्धा जिल्हयातील हिंगणघाट, समुद्रपुर, सेलु तालुक्यातील सिंदी रेल्वे, हमदापुर इत्यादी भागात रस्त्यावरील वाहतुक पुरामुळे काही वेळ बंद झाली होती. अनेक गावामध्ये घरामध्ये पाणी शिरले असून जनजिवन विस्कळीत झाले आहे.दोन दिवसात ऑरेंज अलर्ट मुळे पहिल्याच दिवस जोरदार पाऊस येवून पुर परिस्थिती निर्माण झाली.
बोपापुर ते हायवे रोड पर्यंत ३५ लाख रूपयाचा निकृष्ठ दर्जाचा रोड व पुल बांधला असुन तो एक महिण्याच्या कालावधीत संपुर्ण पणे पकडून भोके पडली आहे. त्यामुळे रहदारीस जनतेला खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्या कामाची सर्वकष चौकशी करून अधिकारी व ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे.
समुद्रपुर तालुक्यातील लाल नाला धरनाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होवुन धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे कोरा, चिखली, मंगरूळ, खापरी, गिरगाव, दसोडा, ताडगाव, डोंगरगांव, नारायणपुर, आसोला, मेंढुंला, करूर पाऊनगांव इत्यादी गावाती
शेत पिके जलमय झाली होती. अशा प्रकारे शेतीचे नुकसान झाले आहे.
तरी सरकारणे शेत पिकांचा सर्व्हे करून शेतकऱ्याना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने शासनाला करण्यात आली आहे.