हिंगणघाट / रमजान महिण्याचे पूर्ण उपास आणि तरावी नमाज नंतर अल्लाह तर्फे ईद हा आनंदाचा दिवस असते.रमजान महिन्यात संपूर्ण मुस्लिम धर्मीय लोकं सकाळ ते संध्याकाळ पर्यंत निरंकार उपवास करते आणि रात्री सामूहिक तरावी नमाज पठण करतात,या एक महिण्याच्या उपासना नंतर अल्लाह तर्फे आनंद साजरा करण्यासाठी ईद चा उपहार दिला आहे.30 रोजे संपल्यावर चंद्र पाहून ईद ची तय्यारी केली जाते सकाळी स्नान करून नवीन वस्त्र परिधान करून ईदगाह मध्ये सार्वजनिक नमाज पठण करतात परंतु या वर्षी औकाळी पावसात ईद नमाज ईदगाह ऐवजी शहरातील संपूर्ण मस्जिद मध्ये नमाज पठण करण्यात आली.यावेळी जामा मस्जिद चे ईमाम साहेबांनी भारतात शांती सलोखा ठेवण्यासाठी अल्लाह कळे प्रार्थना केली.त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व मित्र परिवार व एड. सुधीर कोठारी कृ. ऊ बा. स. सभापती, माजी आमदार राजू तिमांडे, आणि वर्धा लोकसभा उमेदवार डॉ उमेश वावरे सुद्धा आपल्या कार्यकर्ते सोबत उपस्थित होते.