🔥वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथि बोरगांव मेघे येथे संपन्न.
वर्धा -/श्रीराम काॅलनी वार्ड नं ०६ येथील गुरुदेव सेवा मंडळाचे प्रार्थना मंदिर मध्ये दि.१७ व १८ जानेवारी ला वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ५७ वी पुण्यतिथि विवीध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
दि.१७ जानेवारी ला पहाटे ०५:३० वाजता सामुदायिक ध्यानाने दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरवात झाली.व श्री रामदासजी उगले गुरुजींनी ध्यानाचे महत्वावर चिंतन मार्गदर्शन केले.त्यानंतर सकाळी ८ ते ९ परीसर सफाई करण्यात आली.दुपारी १२ ते ०३ पर्यंत महीलांकरीता मकरसंक्रांति निमीत्त हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रसंगी महीलांना मार्गदर्शन व महाराजांचे वाचनीय पुस्तकें भेट देण्यात आली.*
*दुपारी ३ ते ५:३० पर्यंत वं महाराजांच्या प्रतीमेची भजनी मंडळी,दिंडी,पालखीतुन मिरवणुक काढण्यात आली.सायंकाळी ६ ते ७ सामुदायिक प्रार्थना व पार्थनेच्या महत्वावर श्री कृष्णाजी पाहुने आजीवन प्रचारक तथा संस्थापक सचीव गुरुदेव सेवा मंडळ बोरगांव मेघे यांचे मार्गदर्शन झाले.रात्रि ८ ते १० सुप्रसिद्ध गायक श्री दशरथजी पचारे व संच वर्धा यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम झाला.*
*दि.१८ जानेवारी ला पहाटे ५:३० ते ६:३० पर्यंत सामुदायिक ध्यान व ध्यानाचे महत्वावर ह.भ.प.पांडुरंगजी सायंकार महाराज यांचे चिंतनीय मार्गदर्शन झाले.७ ते ८ परीसर सफाई करण्यात आली.९ ते १० सामुदायिक ग्रामगीता वाचन झाले.
दुपारी ११ ते ३ पर्यंत वर्धा जील्हा जेष्ठ प्रचारक श्री बाळकृष्णजी हांडे यांचे जन्मदिनानिमीत्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले व त्यामध्ये समाजातील प्रतीष्ठीत व वं राष्ट्रसंतांचे कार्य पुढे नेणारे माण्यवरांचा व त्यांचे कार्याचा “गुणगौरव सत्कार्याचा” मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी मोझरी, श्री ज्ञानेश्वराव रक्षक नागपुर,श्री मोहनबाबू अग्रवाल देवळी,हभप तुकारामजी घोडे महाराज,प्रबोधनकार सुबोधदादा अड्याळटेकडी, मुरलीधरजी बेलखोडे,डाॅ.विनोदजी जयस्वाल वर्धा,दामोदरजी पाटील मोझरी,अनीलजी नरेडी,सुनीलजी चापके उपस्थित होते,त्यानंतर सर्व उपस्थित पाहुण्यांना प्रासादिक भोजन देण्यात आले.*
*सायंकाळी ६ ते ७ सामुदायिक प्रार्थना व पार्थनेच्या महत्वावर सप्तखंजरीवादक इंजीनियर भाऊसाहेब थुटे यांनी मार्गदर्शन केले.रात्री ८ ते १० शास्त्रीय वारकरी भजन मंडळ नागपुर यांचा सुश्राव्य कार्यक्रम झाला व शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
*कार्यक्रमाचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री अनीलजी टोपले,सचिव श्री कृष्णाजी पाहुने संचालक अंकुशजी चौधरी,अशोकराव मोहदुरे,रुपेश पाटोळे,रमेशराव देशमुख,मित्राजी रामटेके यांनी केले व आयोजित पुण्यतिथि कार्यक्रमाला श्री शंकरराव मोहोळ,श्री चंद्रशेखरजी दरणे,पुरुषोत्तमजी कुकडे,विनोदजी कलोडे,विनोदजी फुकट,सुरेशराव नागपुरे,प्रकाशराव बाकरे,दिलीपराव अतकरे,संजयराव देशमुख, दिलीप सुभाषराव तडस,सौ.सुनीताताई मेघे,सुलभाताई नागपुरे, पल्लवीताई पाटोळे, प्रिती बाकरे,शभम घिनघिने, पुष्पक पाटोळे, सुबोध देशमुख,मयंक हिवंज, रितेश पाटोळे,उत्कर्ष बाकरे,रेणुका दिघडे,विशाखा गोल्हर,धनश्री डहाके,हिमांशी शी हिवंज,अक्षरा डहाके,परी साळवे,श्रद्धा गिरडकर,कादंबरी पाहुणे यांनी सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.