बालाजी मंदिरात प्रजासत्ताक दिन साजरा…जेष्ठ नागरिक व महिला संघटनेचा सहभाग…

0

🔥बालाजी मंदिरात प्रजासत्ताक दिन साजरा.🔥जेष्ठ नागरिक व महिला संघटनेचा सहभाग.

वर्धा -/ नायगांव ( निपाणी) येथील श्री बालाजी देवस्थान सभागृहात २६जानेवारी प्रजासत्ताक दिन व जेष्ठ संघटना स्थापना दिवस मंगलमय वातावरणात साजरा करण्यांत आला.प्रथम दिप प्रज्वल करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संघटना अध्यक्ष डॉ.मनोहरराव शिंदे, श्रीमती अलकाताई हिवसे, आरोग्य सेविका श्रीमती शोभाताई करनाके यांच्या हस्ते करण्यात आले.खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, या कवितेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.जेष्ठ नागरिक व जेष्ठ महीला संघटना अध्यक्ष यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक श्री देवरावजी भोयर, श्रीमती कुसुमताई भोयर, आरोग्य सेवीका श्रीमती शोभाताई करनाके, आशा वर्कर सौ.उषाताई सुरकार,सौ.छायाताई वझे, श्रीमती मिनाताई इखार यांना श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष डॉ.शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन देशभक्ती गीत सादर केले.श्रीमती संगीता तितरे यांनी भारुड सादर केले.महिलांनी दांडिया व खेळ सादर केले सर्व जेष्ठ नागरिक व जेष्ठ महीलांनी भरपूर आनंद व्यक्त केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटना सचिव श्री गजाननराव वरघने यांनी केले.
श्रीमती अल्काताई हिवसे,जे.म.अध्यक्ष श्रीमती कुसुमताई सुपारे जे. म.सचिव,सौ.चंद्रकलाताई नासरे जे.म.उपाअध्यक्ष,श्री बाबाराव ठाकरे, श्री वामनराव सुपारे जे.ना.उपाअध्यक्ष, वासुदेव वाळके शरद काळे, आशिष जाधव सर्व जेष्ठ नागरिक व जेष्ठ महीलांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार देऊन राष्ट्रगिताने करण्यात आली.

चैताली गोमासे साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!