🔥कृषी संस्कृतीचे सण हा निसर्गानी प्रदान केलेला आनंद !
वर्धा -/ अरे हे कोण आमच्या कृषी संस्कृतीतील सणाला साजरे करतांना शुभ-अशुभ सांगणारे ? आमचे सण हे मानवी मुल्य जपणारे आहेत.
कृषी संस्कृतीतील प्रत्येक सण ऋतु संक्रमणाचा मानवी जीवनावर होणारा भौतीक परिणाम याच विज्ञान आमच्या ऋषीमुनींना कळत होत. हा वसंतऋतुच्या आगमनाचा आनंदाचा सण आहे. पण आम्ही बघतो शास्त्राच नाव सांगत, ह्या वेळा पाळा अस तत्वज्ञान सांगत, अनेकदा मानवी मनात भीती निर्माण करतात. त्यामुळे भीतीयुक्त आनंद मानवी जीवनाला दुःखवतात. भीतीपोटी कौटुंबीक माणसीक आजार वाढतो. यावर कुठलच औषध काम करीत नाही.
विद्वान अभ्यासु मित्र यावर कधी बोलतांना दिसत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शुभ-अशुभाच्या कल्पनाच आपल्या मोजक्या शब्दात मांडून समाज मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करतात.
आकाशातील पाहती ग्रह । इकडे स्वभावी वेगळे दुराग्रह ।
जीवनात वाढे ज्यांनी द्रोह । ऐसे त्यांना न दिसती ॥७८॥ ग्रा. अ. २१
काल मी काही नातेवाईकांच्या आग्रहास्तव अमरावतीच्या अंबादेवीला गेलो. मंदिराच्या प्रांगनात महाद्वारासमोरच सुंदर होळी एकदम भव्य सजवीलेली दिसली. शेणाच्या लहाण लहाण वड्या त्याच्या सुंदर माळा होळीत सजवल्या होत्या. आयाबहीनी शेजारी दुकानातून माळा घेत तेथे पुजा करून त्या होळीला चढवत होते.
पण या होलीकेत शेणाच्या माळांसोबतच साखरेच्या गाठ्या ज्या ग्लुकोजडी म्हणून येणाऱ्या उन्हाळ्यात मानवी आरोग्याच सरंक्षण करू शकतात. त्या गाठ्या शेकडो किलोंच्या त्या होली दहनात समर्पन होतील. त्याच गरीब मुलांच्या झोपडीत दिल्यागेल्या असत्या तर कीतेकांच आरोग्य वाचवीण्याच पुण्य आम्हाला लाभल नसत का ? आम्ही शिक्षीत प्रकृतीस्वास्थासाठी विज्ञानाचा सहारा घेतो. मग आमच विज्ञान चुकीच्या धार्मीक श्रध्दा जोपासतांना जागत का नाही ? पाहा मित्रांनो करा चिंतन संत विचार पटत असेल तर ?
होळीचा आला शिमगा सण I त्यात मोठी मारहाण।
लोक इभ्रत, मान सोडोन । पळती मार्गी वेडेसे ॥६६॥ ग्रा. अ. २३
हा वाढला विचित्रपणा I ऐसा नोहे शिमगा जाणा ।
त्यातहि आहे तात्विकपणा घेण्यासारिखा समाजा॥६७॥ ग्रा. अ. २३