लढले नाही तरी चालेल..पण विकल्या जावू नये…!हंसराज कांबळे

0

🔥लढले नाही तरी चालेल..पण विकल्या जावू नये…!हंसराज कांबळे.

वर्धा -/ प्रत्येक समाजातील संघटन हे मजबूत असावे सोबतच समाजहिता करिता – देशहिताकरिता प्रत्येकानी झगडावे.हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा संदेश होता आणि आहे. मजबूत संघटनेच्या माध्यमातून वंचित , पीडित दुर्लक्षित समाजाचे प्रश्न सोडवून त्यांचे जीवनमान उंचवावे. ह्यासाठी त्यांनी उच्चकोटीची ज्ञानसंपदा प्राप्त करून जातीयवादी वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध त्यावेळच्या ना पैसा , ना बुद्धिमत्ता असलेल्या अज्ञानी लोकांना जवळ करुन मजबूत संघटनेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावले होते. म्हणून ते म्हणतात –

माझ्या मागे तुम्हा लोकांच्या अभेद्य ऐक्याचे कवच आहे. त्यानेच मला बळकटी आली आहे. म्हणून तुम्ही आप -आपसात भांडू नका. माना-पानासाठी चढाओढ करून एकमेकात बेकी करू नका.
संदर्भ – खंड – 18 भाग – 2.पृष्ठ. क्रं. 311 पैरा – शेवटचा.वृत्तपत्र जनता. 20 जाने 1940.

आजच्या घडीला सत्ताधारी ब्राम्हणी संघ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपरोक्त संदर्भाला – विचारसरणीला जागृत असून , एकसंघ राहण्याच्या विचारांचे काटेकोरपणे पालन करीत असून त्यांच्यात कार्यकर्ते असे विचाराने प्रेरित होऊन खंबीरपणे निपचतात आणि संघाच्या वाढीसाठी ते सतर्क असतात. त्याचप्रमाणे आपल्याही कार्यकर्त्यांनी एकसंघ कार्यरत राहण्याचा निर्धार केला पाहिजे. ह्याच संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय लिहितात आणि म्हणतात ते पहा –

*तुमच्या मध्ये असे पुष्कळ लोक आहेत की, दुसऱ्यांनी हातभार लावल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही. या कार्यात तुम्ही एक गोष्ट कधीही विसरता कामा नये आणि ती ही की , ” शिल आणि शिक्षण ही जवळच असल्याशिवाय मनुष्याला या जगात काही साध्य करून घेता येणार नाही. दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती ही की , आज तुम्ही स्वातंत्र्य व स्वावलंबन मिळवण्याकरिता लढा चालविला आहे. त्यात तुम्हास यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही बाहेरच्या माणसांच्या मदतीची अपेक्षा न करता परावलंबी जिण्यापासून अगदी अलिप्त राहिले पाहिजे. हे तुम्ही जर करणार नाही तर ध्यानात ठेवा , तुम्ही परत गुलामगिरीच्या गर्देत पडाल . ज्या स्पृश्य हिंदूंनी आजपर्यंत तुम्हाला दास्यत्वात खितपत ठेवले ते तुम्हाला आमिष दाखवून मदत करण्याकरिता एका पायावर तयार देखील होतील.*
*पण जर तुम्ही या मोहाला बळी पडला तर त्यांच्या पायातील तुम्ही घुंगरू बनाल व तुमच्या नशिबाची गुलामगिरी टळणार नाही.*
संदर्भ – खंड – 18 भाग – 1.पृष्ठ. क्रं. 449.पैरा – 2.मधली ओळ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे सर्व धर्मीय लोकांना भौतिक सुख प्रदान केले आहे. फक्त आणि फक्त एकसंघटित राहून न्याय – हक्कासाठी झगडणे आहे. परंतु ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील शोषित – पीडित लोकांना गुलामगिरीच्या गर्देतून मुक्त केले आहे. परंतु ह्याचे भान विसरून आजचे समाजातील काही भाडोत्री पुढारी आमिषापोटी – लालसेपोटी पुन्हा ब्राम्हणी सत्ताधारी संघात सामील झाले आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दूरदृष्टीपणामुळे उपरोक्त संदर्भात शेवटी – पण जर या मोहाला बळी पडला तर त्यांच्या पायातील तुम्ही घुंगरू बनाल व तुमच्या नशिबाची गुलामगिरी टळणार नाही.* हे म्हणण्या मागचे काय प्रयोजन होते. ते समजून घेणे गरजेचे आहे.

म्हणून लढले नाही तरी चालेल, पण विकल्या जावू नये.!

तूर्तास एवढेच !

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!