🔥यशवंत कनिष्ठ महाविद्यालय,भिडी येथील उत्कृष्ट निकाल.
भिडी -/ एच एस सी फेब्रुवारी/ मार्च 2026 बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालामध्ये यशवंत कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयांचा उत्कृष्ट निकाल लागलेला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयामधून एकूण 26 विद्यार्थी बोर्ड परीक्षेला प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 23 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. महाविद्यालयामधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारी विद्यार्थिनी कु.अंकिता जोगवे 54.33 % तर द्वितीय क्रमांक कु.विभा गौलकार 51.58%आणि तृतीय क्रमांक अभिशेख वीरूटकर 48% एकंदरीत महाविद्यालयांचा निकाल 88.46% लागलेला आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी या महाविद्यालयाने कायम आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय समीरभाऊ देशमुख, उपाध्यक्ष सतीश राऊत साहेब, जनरल सेक्रेटरी प्रकाशराव ढांगे साहेब , तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि महाविद्यालयांचे प्राचार्य माननीय अनिल ढांगे तसेच प्रा. अरविंद राठोड,प्रा राजेश जोगळे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.