🔥(धक्कादायक घटना,)सुरगाव येथील वयोवृद्ध व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू.
सेलु -/ तालुक्यातील सेलु नजीकच्या सुरगाव येथील भानुदासजी गायकवाड वय ७० वर्ष हे वयोवृद्ध जोडपे.स्वतःच्या घरातील वरच्या मजल्यावर झोपले होते.व परिवारातील अन्य सदस्य खाली झोपले होते.दि.२१ मे गुरुवारचे रात्री वातावरणाच्या उकाड्यामुळे ११ वाजताच्या दरम्यान अस्वस्थता जाणवत असल्यामुळे हवेशीर येण्यासाठी जागेवरुन हलण्याचा प्रयत्न करत असता तोल सुटला व जागीत गतप्राण झाले. उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाल्याची सेलु परिसरातील तीन दिवसातील ही धानोली (मेघे) नंतरची दूसरी घटना आहे.