🔥कोटेश्वर येथे पाण्यात बूडून बालिकेचा मृत्यु,वडील बचावले.
भिडी प्रतीनीधी,(राजू वाटाणे)
देवळी,भिडी -/ अधिक मासाला प्रारंभ झाला असून श्रिक्षेत्र कोटेश्वर येथे भाविकांची मोठ्या प्राणांत आघोंळ,पूजा अर्चना करण्याकरीता दूर दूर वरून भावीक येथे येत आहे यात वर्धा नदीत भावीक आंघोळ करतात पन येथे वर्धा नदीवर कोणतीही भाविकांना धोक्याच्या सूचना देण्याकरीता कोणतीही व्यवस्था नसल्याने येथे अपघात नेहमी घड़ंतच असतात.यातच आज वर्धा येथिल भाविक आपल्या दहा वर्षाच्या मूलीला घेवून वर्धा नदीमध्ये आंघोळीला गेला असता नदिपात्रातील सिमेंट पा-यावर साचलेल्या पाण्याने चिला पकडला त्यावर पायघसरल्याने दोघेही बापलेक खोल पाण्या मंध्ये पडले त्यात वडिला जवळून मूलगी निसटून पाण्यात बूडाली तर वडील हाथ वर करत बूडत असता तेथे उपस्थीत असना-यांच्या नजरेत दिसले तसेत काहीनी नदित उड्या घेवून मुलीच्या वडीलाला बाहेर काढले त्यांना शूधिवर आलेवर त्यांनी सांगीतले की माझे सोबत मांझी मूलगी आहे व लगेच मूलीचा शोध घेतला असता मूलगि मृत्यु पावली होती
प्रिय दर्शणी काॅलेज वर्धा येथील रहिवासी मनोज तावड़े हे आपल्या परिवारासह कोटेश्वर येथे अधिक मासांत आंघोळ,पूजा अर्चना करण्याकरीता आले असता सकाळी सहा वाजता आंघोळी करीता मनोज तावड़े त्यांची मूलगी कू .भक्ती तावड़े वय 10 वर्ष रा.वर्धा हे दोघे बापलेक नदीपात्रातील पाय-यावर असलेल्या पाण्यात आंघोळीला गेले यात वडीलाचा पाय-यावर असलेल्या चिल्यावरून पाय घसरल्याने ते मूलीसह खोल पाण्यात पडले त्यात त्यांच्या हातून मूलगी निसटल्याने ती पाण्यात बूडाली तर मनोज तावड़े हेही डूबन हाथ वर करत होते त्यातच तेथील काही उपस्थीतांनी त्यांना वर काढले व त्यात त्यांना शूधिवर आलेवर त्यांनी सांगीतले की मांझी मूलगी माझ्या सोबती होती व लगेच तिचा शोध घेतला असता मूलगि मृत्यु पावली होती तरी तिला भिडी येथे रूग्णालयात आनन्यात आले पूढिल तपास देवळी पोलीस करीत आहे.