रसुलाबाद (बोरी) येथे वाघाने वासराचा पाडला फरशा

0

🔥रसुलाबाद (बोरी) येथे वाघाने वासराचा पाडला फरशा.

रसुलाबाद -/ गावा लगतच असलेल्या बोरी बारा येथील कुऱ्हा तलाव जवळच दुपारी दोनच्या सुमारास गाई चारत असतांना वाघाने मोठ्या वासराचा फरशा पाडला, हे वासरू मनोहर मानकर यांचे होते. शिकार केल्यानंतर गायकी लोकांनी वाघाला बघताच त्यांनी सरपंच राजेश सावरकर आणि पोलीस पाटील शाम काकडे यांना संपर्क साधला आणि माहिती दिली त्यानंतर सरपंचांनी तालुका वन अधिकारी आर्वी गवारले यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली व लगेचच वन विभागाचे पथक वन विभागचे तालुका अधिकारी सहित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी कॅमेरे फिट केलेले आहे.

आत्ताच पंधरा दिवसापूर्वी रसुलाबाद ग्रामपंचायत शिवारात निखिल सावरकर यांच्या शेतात ओलीत मध्ये दिसले पंजे हे याच वाघाचे असावे अशी शंका आता वर्तविण्यात येत आहे.  

ग्रामपंचायत रसुलाबाद ने गावकऱ्यांना दवंडी देऊन सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

            ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!