रस्ता सुरक्षा न केल्यामुळे दोन जण पुलाचे बांधकाम मध्ये पडून गंभीर जखमी

0

🔥रस्ता सुरक्षा न केल्यामुळे दोन जण पुलाचे बांधकाम मध्ये पडून गंभीर जखमी.

 सेलू -/ तालुक्यातील येळाकेळी ते सेलू चा रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी कोंगा बाभुळगाव येथील गावाजवळ पुलाचे काम सुरु आहे. परंतु रस्ता नियमांचे उल्लंघन करून ठेकेदार याने काम सुरू ठेवले. काल रात्री च्या सुमारास सूरगाव येथील रितिक चेनेकर वय २३ वर्ष व त्याचा मित्र रूपेश मेश्राम हे येळाकेली वरून सुरगांव गावी जात असताना पूल बांधकाम जागी सुरक्षा कठडे न बसवल्या मुले दोघेही १० फूट खोल खड्यात पडले यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दोषी कंत्राटदार व शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा यांचे वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकरी यांनी केली आहे तसेच जखमी झालेल्या लोकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील केली आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!