🔥चमडीचोर लुच्छा सतीश मालनवारच्या कारनाम्यांनी बाभूळगाव तालुक्यात संताप; २५ लाखांच्या बँक घोटाळ्यासह महिलांच्या शोषणाचे आरोप, पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
यवतमाळ प्रतिनिधी -/ सत्ताधारी पक्षाच्या नावाचा गैरवापर करून सामान्य नागरिकांची लूट, शासकीय योजनांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार आणि सत्य समोर आणणाऱ्यांवर थेट जीवघेणे हल्ले चढवणाऱ्या स्वयंघोषित भाजपा पदाधिकारी चमडीचोर लुच्छा सतीश मालनवारच्या कारनाम्यांमुळे बाभूळगाव तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेतून २५ लाखांचे कर्ज लाटून केलेली कथित फसवणूक, कृष्णापूर ग्रामपंचायतीचा घोटाळा उघड करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यावर झालेला खुनी हल्ला आणि महिलांच्या शोषणाचे अत्यंत गंभीर आरोप असतानाही स्थानिक पोलीस यंत्रणेकडून कारवाईत होत असलेली दिरंगाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुराव्यानिशी तक्रारी दाखल होऊनही मालनवारवर गुन्हे नोंदवण्यास टाळाटाळ होत असल्याने पोलीस-प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.जिल्ह्यात सत्तेच्या सावलीखाली फोफावलेल्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक नमुना बाभूळगाव तालुक्यात चव्हाट्यावर आला आहे. स्वतःला भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणवून घेणारा सतीश मालनवार हा गेल्या काही काळापासून विविध आर्थिक घोटाळे, फसवणूक आणि धमकावण्याच्या प्रकरणांमुळे चर्चेत आहे. आता या स्वयंघोषित पदाधिकाऱ्याविरोधात २५ लाख रुपयांच्या बँक फसवणुकीसह आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चमडीचोर लुच्छा सतीश मालनवार याने केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान मुद्रा लोन योजने’चा गैरवापर करत तब्बल २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. कागदोपत्रांवर भव्य दुग्ध व्यवसाय (दूध डेअरी) सुरू केल्याचे भासवून प्रत्यक्षात कोणताही प्रकल्प न उभारता ही रक्कम हडपल्याचा थेट आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
या फसवणुकीची गंभीर दखल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (यवतमाळ शाखा) व्यवस्थापनाने घेतली असून, प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बँकेची दिशाभूल करून सार्वजनिक निधीचा अपहार केल्याप्रकरणी मालनवारविरोधात कायदेशीर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया व्यवस्थापनाकडून तातडीने हाती घेण्यात आली आहे. शासकीय अनुदानाचा आणि सवलतीच्या कर्जाचा असा उघड गैरवापर उघडकीस आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
चमडीचोर लुच्छा सतीश मालनवार याच्या भ्रष्टाचाराची व्याप्ती केवळ बँकांपुरती मर्यादित नसून स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचली असल्याचा आरोप आहे. कृष्णापूर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विकासकामांच्या कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याची माहिती माहिती अधिकाराखाली बाहेर काढणाऱ्या एका स्थानिक कार्यकर्त्याला मालनवारने थेट लक्ष्य केले.
घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला चढवून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. हा भ्याड हल्ला करून तालुक्यातील भ्रष्टाचारविरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न झाल्याने स्थानिक जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या घटनेनंतर तक्रारदाराने बाभूळगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी तक्रारदाराचे सविस्तर बयाण नोंदवून घेतल्याचे समजते.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार,चमडीचोर लुच्छा सतीश मालनवार याच्यावर केवळ आर्थिक घोटाळ्यांचेच नव्हे, तर महिलांचे शोषण केल्याचे आणि त्यांना धमकावल्याचेही अत्यंत गंभीर आरोप आहेत. त्याच्या या कृत्यांमुळे परिसरात त्याच्याविरुद्ध तीव्र नाराजीचे वातावरण आहे. मात्र, इतके गंभीर आरोप आणि ठोस पुरावे समोर आणूनही बाभूळगाव पोलीस ठाण्यात अद्याप त्याच्यावर कठोर कलमान्वये तात्काळ गुन्हे का नोंदवण्यात आले नाहीत, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदारांनी आक्षेप घेतला असून, सामान्य नागरिकांवर किरकोळ कारणांवरून कारवाई करणाऱ्या यंत्रणेकडून अशा राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करताना मात्र वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
स्थानिक पातळीवर न्यायाची अपेक्षा धुळीस मिळाल्याचे पाहून संतप्त तक्रारदाराने थेट गृह विभागाचे दार ठोठावले आहे. गृहमंत्री पंकज भोयर यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या भूमिकेबाबतही तक्रारदारांनी तक्रारीत गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. जिल्हा पोलीस प्रशासन सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आणि त्यामुळेच चमडीचोर लुच्छा सतीश मालनवारसारख्या व्यक्तीला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी उघडपणे केला आहे. आर्थिक फसवणूक, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शोषणाचे आरोप असणाऱ्या सतीश मालनवारवर पोलीस प्रशासन आता नेमकी काय कारवाई करते, की राजकीय दबावापुढे झुकून हे प्रकरण थंड बस्त्यात टाकले जाते, याकडे आता संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)