घोराड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ.!

0

🔥घोराड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ.!

सेलू -/ तालुक्यातील घोराड येथील वार्ड क्रमांक १ मध्ये एका ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रशांत भोजराज ढोबळे (वय ३८) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे घोराड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत ढोबळे हे गेल्या काही दिवसांपासून कर्जाच्या वाढत्या ताणासह काही घरगुती कारणांमुळे त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. याच मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सेलू पोलीस ठाण्याचे पीएसआय नल्लावार तसेच पोलीस अंमलदार नितीन डाखोळे यांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, एका तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News -/24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!