लहान आर्वी परीसरात वादळी वारा व गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान..

0

तर पिलापुर (एनाडा)येथे घर उडाल्याने लाखोंचे नुकसान..

गजेंद्र डोंगरे वर्धा / लहान आर्वी परीसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात एकदमच बदल होऊन वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने व गारपिटीने शेतकर्यांचे शेतातील रब्बी ज्वारी, गहु,कांदा,मका, संत्रा आणि मोसंबी तसेच भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परीसरातील मौजा लहान आर्वी,सुजातपुर,विठ्ठलापुर,लिंगापुर, जैतापुर,चेकबंदी, आणि पिलापुर,एनाडा येथे शेतकऱ्यांना शेताता अतोनात नुकसान झाले आहे. मौजा सुजातपुर येथे राजेंद्र गणपत चरडे यांनी शेतात काढुन ठेवलेला कांदा पुर्णपणे ओला झाल्याने अतोनात नुकसान झाले तर त्याच मौजातील बाबाराव दादाराव लांडे यांच्या शेत सर्वे नंबर १२०/१ मध्ये तसेच भानुदास सूर्यभान लांडे यांच्या शेतातील आंबीया बहाराचा संत्रा पुर्णपणे खाली आला आहे तर मका पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. मौजा एनाडा येथे राजु पुंडलिकआप्पा परणकर यांच्या शेत सर्वे नंबर ११ मधील गहु पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तर याच मौजातील कौशल्या विश्वास सायरे यांच्या शेत सर्वे नंबर ६४ मधील गहु पिकाचे सुध्दा शंभर टक्के नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.
यातच दिनांक ९ एप्रिल चे रात्री अचानक आलेल्या वादळामध्ये पिलापुर (एनाडा) येथे मोठ्या प्रमाणावर वादळ, गारपीट आणि पावसाने मोहण रामहरी चरोडे यांचे नव्यानेच बांधकाम केलेल्या घराचे छप्पर उडाल्याने त्यांच्या घराचे व घरातील साहीत्यांचे आणि शेत मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पिलापुर येथील तेजराव सहारे यांच्या घराजवळ असलेल्या झाडावर वीज पडल्याने मोठा अनर्थ टळला.जागोजागी विद्युत तारा पडल्याने काळोख पसरला होता.त्यामुळे रात्री भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच तेथील पिलापुरचे सरपंच हेमंत खापरे यांनी घटनास्थळी भेट देवून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. आणि पिलापुर गावात ठीक ठिकाणी विद्युत पोल च्या तारा तुटुन गाई आणि म्हशींच्या अंगावर त्या तारा पडल्याने सरपंच हेमंत खापरे यांनी विद्युत कर्मचारी के.पी. माथने यांना तातडीने रात्रभर विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचे सांगितले.यावेळी पिलापुर(एनाडा) तसेच परीसरात सर्वात जास्त नुकसान झाले असल्याने महसुल प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी आष्टी क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप देशमुख यांनी भ्रमणध्वनीवरून प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!