हिंगणघाट -/ आज २७ दिन रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा नांदगाव येथील येनोरा रोड ला लागून असलेल्या प्लॉटिंग मधील खाली प्लॉट वर अवैधपणे साठा केलेला अंदाजे 120 ब्रास रेती साठा उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले व महसूल विभागाच्या पथकाने जप्त केला.जप्त केलेली सर्व रेती तहसील कार्यालयात जमा करण्यात येत असल्याचे समजते.शहरात अवैधपणे साठा केलेल्या रेतीचा शोध घेण्याकरिता महसूल विभागाने पथके स्थापन केली असून सदर पथकांच्या मार्फतीने रेती साठ्यांचा शोध घेऊन जप्तीची तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांनी दिली. (क्रमशः)