महाराष्ट्र अन्नधान्याने समृद्धीची नाईकांनी केली होती प्रतिज्ञा….

0

देवळी -/ पंचायत समिती मध्ये कृषि दिन स्व.वसंतराव नाईक महाराष्ट्र‌ाचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्नधान्याने महाराष्ट्र संपन्न साला पाहिजे यासाठी त्यान्चे कार्य अतिशय मोलाचे आहे.जास्त उत्पादन देणारे बियाणे लागवडीचा प्रयत्न,कृषि विद्यापीठे स्थापन, कृषी तंत्र व शिक्षणावर भर देऊन कृषि क्रांती घडवून आनाली वसंतराव नाईक गयांच्या कर्तृत्वाची ऊंची फार भाठी आहे.ती कुणालाहि गाठता येणार नाही असे प्रतिपादन गट विकास अधिकारी प्रफुल लोखंडे यांनी मत व्यक्त केले.कृषी विभागाच्या वतीने कृषि दिनाचा कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात आयोजीत करण्यात आला यावेळी गट विकास अधिकारी प्रफुल लोखंडे अध्यक्ष स्थानी होते”तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी आधिकारी प्रतिधा मेंढे,कृषि अधिकारी अनिक आदेवार, युवराज जंगले, के व्ही के चे शास्त्रज्ञ गजानन म्हसाळ,सचिन मालकर रितेश करोडे, राम अंभोरे यांची उपस्थीत होती.कृषि अधिकारी अनिल आदेवार यांनी प्रास्ताविकातून कृषि दीना विषयी माहिती दिली व कृषि तंत्राचा वापर करुन शेतकऱ्यांनी शेती करावी असे सांगितले.यावेळी कृषि शास्त्रज्ञ सचिन मालकर यांनी शेतीतील माती परीक्षणामुळे लागवड खर्च कसा कमी होतो यावर मार्गदर्शन केले.तालुका कृषि अधिकारी प्रतिक्षा मेंढे यांनी शेती विषक विविध योजना व पिक विम्याची माहिती देतांना फळबाग लागवड व शासनाकडून मिळणारे अनुदान यावर मार्गदर्शन केले. तालुक्यातील वेगळी शेती व संशोधन करणाऱ्या शेतकऱ्याचा सत्कार करण्यांत आला.यामध्ये श्रीधर हुडे पळसगाव सेंद्रिय शेती,सरिता झिल्पे शेती प्रक्रिया उद्योग,राजेश नेजेकर ड्रैगन फुड लागवड या विशेष करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमामध्ये सत्कार करणा-या शेतकऱ्यांनी आपण करीत असलेली शेती विषय माहिती व उत्पादना विषयी माहिती सांगितली.महिला शेतकरी सरिता झील्पे यांनी आपले अनुभव व स्वागत गित सादर केले.मनोगत व माहिती देणान्यामध्ये मिनाताई मालेकर नीतेश करोडे,राम अंभोरे सह इतर शेतकुरी व कृषि अधिका-यानी कृषी विषय लागवड,गांडुळखत पिक विमा व अधिक उत्पादन देणाऱ्या पिका विषय मार्गदर्शन केले.                          🔥शेती मध्ये नविन लागवड पध्दत,माती परिषण करुन आपण खते प्रमाण बद्ध दिले तर लागवड खर्च कमी करता येतो नचिन नविन प्रयोगाद्वारे व कृषी तंत्राचा वापर करून शेतीवर भर द्यावा आणि शेती करावी जेणे करुन आपण शेती मध्ये जास्तीत जास्त आर्थिक लाभ घेऊ शकतो प्रतिक्षा मेढे,तालुका कृषी अधिकारी देवळी.)              कार्यक्रमात शेतीविषयक आवड असणाऱ्या शेतकरी महिला व पुरुषांची उपस्थीती होती.कृषि अधिकारी युवराज जंगले यांनी आभार मानले.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!