आजनादेवी वन तलावातून परवानगी न घेताच टँकरणे पाण्याची चोरी….

0

🔥हेच ते आजनादेवी वन तलावातून परवानगी न घेताच टँकरणे पाण्याची चोरी.🔥आष्टी तालुक्यातील मुरूम व जांब नदीचे पाणी चोरी केल्यावर आता कारंजा तालुक्यातील आजनांदेवी वन तलाव तुन रात्र दिवस पाणी उपसा.

आष्टी शहीद -/ आष्टी ते कारंजा (घा.) सिमेंट रस्त्याचे बांधकाम वनविभागाच्या हद्दीत मध्य रात्री मशीनच्या साहाय्याने बांधकाम सुरु असून त्यावर पाणी टाकण्यासाठी आता कारंजा घा. तालुक्यातील आजनांदेवी जंगलात असलेल्या वन तलावातून डिझेल इंजिन लावून पाण्याचा उपसा सुरु आहे.सविस्तर असे कि,
आष्टी ते कारंजा (घा.)या दोन तालुक्यातील गावाला जोडनाऱ्या मार्गाचे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राट दाराने आता पर्यंत आष्टी तालुक्यातील बोरखेडी वन तलावातून कोट्याधीश रुपयाचा मुरूम चोरून नेला. त्यानंतर जांब नदीचे पाणी चोरून नेले गावकर्यांनी तक्रारी केल्यावर पाणी उपसा बंद करण्यात आला. या कंत्राट दारावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
जानेवारी महिन्याच्या कालावधीत पार्डी पासून कारंजा कडे आजनांदेवी जंगल परिसरात सिमेंट रस्ता बनविण्याचे काम मध्यरात्री सुरु आहे. याच भागात वन तलाव लागून आहे या तलावात वन्य प्राणी पाणी पिण्या साठी ये जा करतात. असे असताना बांधकाम करणाऱ्या कंत्रात दाराने आजनादेवी वन तलावातून झिसेल इंजिन लावून टँकर ने पाणी उपसा करीत आहे. या तलावातील पाणी शेतीच्या कामासाठी वापरण्यास येत असून आता या पाण्यावर कोणतीही परवानगी न घेता चोरी करणे सुरु आहे. हा सर्व प्रकार आमचे प्रतिनिधी ने कॅमेऱ्यात केला. या घटनेची माहिती तळेगाव वनविभाग यांना देण्यात अली. येथील बिटगार्ड शोधून दिसत नसल्याने पाण्याची चोरी होत आहे असा गावाकरू्छांचा आरोप आहे.

प्रतिक्रिया -/ सुचिता धंडाळे सामाजिक कार्यकर्ते
आजनादेवी वन तलावातून शेतीला पाणी देण्यात येते. शेतीत सिंचन करण्यासाठी येथील पाणी वापरण्यास येते. रात्री वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी याच तलावावर ये जा करतात. उन्याळ्यात पाणी टिकवून ठेवणे हे काम वनविभागाचे आहे. परवानगी न घेता पाणी उपसा करणे कायद्याने गुन्हा आहे.

नरेश भार्गव साहसिक News-/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!