दूरदर्शी नेत्याच्या दूरदृष्टी ला -झारीतील शुक्रचाऱ्यांच्या कु -दृष्टी च ग्रहण

0

🔥दूरदर्शी नेत्याच्या दूरदृष्टी ला -झारीतील शुक्रचाऱ्यांच्या कु -दृष्टी च ग्रहण.

🔥युतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अ.प ची भूमिका आरसा सारखी -दिलीप पोटफोडे.

🔥अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणा मुळे दर्जा हीन काम दाखवत लक्ष वेधले 

आर्वी -/ आर्वी न.प निवडणुका 3 महिन्या पूर्वी झाल्यात आणि आर्वीकरानी सर्व पक्षाना सर्व समावेशक कौल अतिशय जागृक पणे दिल्याच यावेळी अनुभवता आल. या निवडणुकीत सर्व पक्ष आप आपल्या पूर्ण ताकदीने निवडणूक लढलेत यात निर्णयाअंती -भाजपा, यांच्या नगराध्यक्षा + 14, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( श.प) 7 – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 2 अश्या एकूण 9, शिवसेना उ.बा.ठा 1, तर अजितदादा पवार विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची 1 शीट असे 25 नगरसेवक व नगराध्यक्षा निवडून आलेत, सत्तेत बसताना भाजपा सोबत अजितदादा पवार विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नी आमदार सुमितदादा वानखेडे यांच्या विकासाच्या दूरदर्शी व दूरदृष्टी ला पाहता तसेच जेष्ठ नेते सुधीरजी दिवे यांचे मार्गदर्शनाला व आर्वी शहराच्या विकासाच स्वप्न साकार व्हावं ही भावना ठेवत निःस्वार्थ पणे पाठिंबा दर्शवत साथ दिली तर, शिवसेना उ बा ठा ने लोकसभा खासदार अमर भाऊ काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विरोधात बसण्याची भूमिका घेतली, यावेळी मित्र पक्ष म्हणून आमदार सुमितदादा वानखेडे यांनी योग्य तो सन्मान देखील सभापती पद व समित्या कमेट्या देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला दिला त्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत समाधान व आभार व्यक्त केलेत.

परंतु आर्वी न. प. चा नियोजनाचा कारभार ज्या कारभाऱ्यांना दिला गेला त्या कारभाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने आर्वीत सर्वत्र असंतोषचा वातावरण निर्माण झालंय, आर्वी न.प ला कधी नव्हे इतका भरीव निधी आमदार सुमितदादा वानखेडे यांच्या कुशल नेतृत्वात उपलब्ध होत असताना त्या निधीच योग्य वापर व नियोजन होणे आवश्यक असताना येथील हस्तक मात्र स्वतःच्या हितासाठी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन लोकविरोधी निर्णय घेण्यासाठी कुठे ही मागे पुढे न पाहता व याचा दुर्गामी परिणामाची चिंता न करता सत्तेचा अतिरेक करत असल्याची चर्चा आता आर्वी शहरात गल्लोगल्ली सुरू झाली, सेवक आता मालक होऊन लूट करत असल्याचे नागरिक उघड बोलु लागलेत , नागरिकांना गृहीत धरून लोक विरोधी निर्णयाचा आणि स्वहित साध्य करण्याचा सपाटा आर्वी न.प मधील लाभार्थी यांचा सुरू आहे, यात पटीने टॅक्स वाढ, असो, कंत्राटदारा द्वारा पाणी पुरवठा करून दर टँकर ला 1500 रू आकारणी सारखा लोकविरोधी व कंत्राटदाराचा हिताचा निर्णय असो, घन कचरा संकलन व मनुष्य बळ पुरवठा कंत्राटात होत असलेला भ्रष्टाचार असो, आरोग्य विभागात झालेले सर्व लूट करणारे कंत्राट लोकविरोधी व आर्वी न.प च्या आर्थिक वृद्धी करिता घातक असून व्यक्तीकेंद्रित लाभासाठी झाल्याचे दिसून येत आहे, अधिकारी मस्तवाल झाले असून,स्थानिक नगरसेवक -नगरसेविका पदाधिकारी यांच ऐकायला कोणी तय्यार नाही, कोणताही अधिकारी फिल्डवर दिसून येत नाही सर्वत्र कामाचा धिंगाणा सुरू आहे, परिणामी कामाचा दर्जा घसरला आहे, नियमाप्रमाणे काम होत नाही लोकशाही कमी कामात हुकूमशाही जास्त दिसून येत आहे, कॅटली च जास्त गरम अशी परिस्थिती आर्वी शहरात निर्माण झाल्याने, या सर्व परिस्थिती कडे दूरदर्शी नेत्याच लक्ष वेधण्यासाठी सर्व बाबी लक्षात आणून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडुन युतीत आरसा म्हणून भूमिका घेतल्या जाईल असं स्पष्ट केल आहे, याचाच प्रत्यय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे नुकत्याच झालेल्या दर्जाहीन ड्रेनेज च काम दाखवत लक्ष वेधण्यात आलं आहे.

               राजू डोंगरे साहसिक        News-/24 आर्वी 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!