🔥सेवा निऊत्त पोलीस कर्मचाऱ्यांची बांधकाम करणाऱ्या मजुराला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी.
🔥आष्टी पोलिसात तक्रारी दाखल, गुन्हा दाखल करा गावाकऱ्याची मागणी, आबाद किन्ही गावात दहशत
आष्टी शहीद -/आष्टी तालुक्यातील आबाद किन्ही गावात सासऱ्याच्या शेतात वाही पेरी करण्यासाठी म्हणून बाहेर गावातील रहिवासी एक सेवा निऊत्त पोलीस कर्मचारी गावात राहायला आला. घर नसल्याने तो घर किरायाने घेऊन नवीन घराचे बांधकाम करीत आहे. त्या घराचे बांधकाम करण्यासाठी आष्टी येथील मिस्त्री ला एक लाख रुपयात घर बांधायला दिले. बांधकाम केल्यावर मिश्री ने पैसे मागितले तर त्याला फोन वरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून मिश्री नें आष्टी पोलिसात तक्रार दाखल करून सखोल चॊकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
सविस्तर असे कि,
आबादकिन्ही गावात सेवा निऊत्त पोलीस कर्मचारी सुनील गुलाबराव हावरे वय 65रा. आबादकिन्ही हा गावात नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी राहत आहे. सासऱयांची प्रापार्टी वर त्यांनी हिस्सा घेऊन शेतीत वाही पेरी करीत आहे. घराचे बांधकाम करताना त्याने आष्टी येथील मनोज हेडाऊ नामक मिस्त्री ला घराचे बांधकाम करण्याचा कंत्राट दिला. महिना भर काम केल्यावर मजुराणा मजुरी द्यायची म्हणून मनोज हेडाऊ हा सेवा निवृत्त पोलीस कर्मचारी यांना मजुरीचे पैसे द्या म्हणून विनवानी करू लागला मात्र त्याने पैसे दिले याउलट फोनवर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मनोज हेडाऊ यांनी आष्टी पोलिसांना तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. सुनील हावरे यांनी या अगोदर सुद्धा गावातील माजी सरपंच मुकिंदा झामडे यांना सुद्धा शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तो येवढ्यावरच थाबला नाही तर त्याने स्वस्त धान्य दुकानात जाऊन नासधूस केली होती. गावात दारू बंदी च्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या घरी जाऊन नेहमीच हातात काठ्या घेऊन धुमाकूळ घालतो. हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद असून या घटनेची सुद्धा आष्टी पोलिसांना तक्रार दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी जाऊन हातात कुऱ्हाड घेऊन कल्याणी काकडे यांच्या पतीला शिवीगाळ करतो. गावात दहशत असून एका बकरीचा सुद्धा त्याने अपघात घडवून आणला होता. पत्रकार यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी अंगावर धावून जाऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. या घटनेची माहिती ठाणेदार जोशी यांना सुद्धा दिली होती. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दहशत्तीमुळे गावातील नागरिक दहशतीत आहे. पोलिसांना तक्रारी दिल्या मात्र कडक कार्यवाही अदयाप झाली नाही.(क्रमशः)