🔥 दिवसा पूर्वी स्मशानभूमी आठतील साहित्याचीही केली होती तोडफोड.🔥ग्रामपंचायत फोडणारे अज्ञात चोरटे तेच असावे असा ग्रामपंचात प्रशासनासह नागरिकांचा अंदाज.
आष्टी शहीद -/अज्ञात चोरट्याने दिनांक 22 मार्च रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाचे साखळी व कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करत काचेच्या दाराची तोडफोड केली आठ दिवसापूर्वी रंगपंचमीला सुद्धा साहूर येथील काही दारूबहाद्दर उपद्रवी युवकांनी स्मशानभूमीतील ग्रामपंचायतच्या काही साहित्याची तोडफोड केली होती आणि आठ दिवसानंतर आता लगेच ग्रामपंचायतचे दार तोडून ग्रामपंचायतच्या साहित्याची तोडफोड करणारे अज्ञात चोरटे सुद्धा स्मशानभूमीतील तोडफोड करणारेच असावे असा अंदाज ग्रामपंचायत प्रशासनासह नागरिकांनी व्यक्त केला आहे याबाबत सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे
प्राप्त माहितीनुसार साहूर ग्रामपंचायत कार्यालय गावाच्या बाहेर एक किलोमीटर बस स्टॅन्डला लागून आहे नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून घरी निघून गेले मात्र रात्री साडे आठ ते नऊच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे मुख्य दाराचे कुलूप व साखळी तोडून आत मध्ये प्रवेश केला व ग्रामपंचायतच्या मध्यभागी असलेल्या काचेच्या दारासह साहित्याची तोडफोड केली याबाबत रात्री साडेनऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळून ये जा करणाऱ्या काही युवकांना ग्रामपंचायतचे दार उघडे असून तोडफोड केली असल्याचे निदर्शनास आले त्यांनी लगेच सरपंच प्रकाश गायकवाड यांना फोन करून सदर घटनेबद्दल माहिती दिली सरपंच व इतर सदस्यांनी ग्रामपंचायत मध्ये येऊन पाहले असता ग्रामपंचायतचे दार तुटलेले व तोडफोड केलेले आढळून आले नुकत्याच आठ दिवसापूर्वी झालेल्या रंगपंचमीला सुद्धा ग्रामपंचायतच्या हद्दीतील स्मशानभूमीतील पाण्याची टाकी नळ कनेक्शन बसण्याचे बेंच व टीन पत्र्याचे काही दारूबहाद्दर उपद्रवी युवकांनी तोडफोड केली होती त्या युवकांच्या विरोधात ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती कदाचित त्याचा वचपा म्हणून त्याच दारूबहाद्दर उपद्रवी लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या साहित्याची तोडफोड केली असावी असा अंदाज ग्रामपंचायत प्रशासनासह नागरिकांनी व्यक्त केला आहे कारण अज्ञात चोरट्यांनी तोडफोड केली त्यादिवशी येथील आठवडी बाजार होता आणि आठवडी बाजाराच्या दिवशी या ठिकाणी दारू विकणाऱ्यांची व पिणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या असते त्यामुळे हा प्रकार सुद्धा दारूच्या नशेतच काही दारू बहाद्दर उपद्रवी नागरिकांनी केला असल्याचे बोलल्या जात आहे सरकारी साहित्याची तोडफोड करणे हा कायद्याने मोठा अपराध असून अशा अपराधाला काही नागरिकाकडून पाठीशी घातल्या जात आहे परिणामतः या दारूबहाद्दर नागरिकांचा उपद्र वाढत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनासह काही नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लागून आहेत परंतु त्या कॅमेरा मध्ये डाटा सेव्ह होत नसल्याने व टेक्निकल प्रॉब्लेम असल्याने कॅमेऱ्यामध्ये घटना कैद झाली नसल्याचे सांगण्यात येते दारू पिऊन उपद्रव करत शासकीय मालमत्तेची तोडफोड करणाऱ्या अशा उपद्रवी युवकावर व नागरिकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सरपंच सचिव ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी केली आहे.