अनुभव शिक्षा केंद्र वर्धा अंतर्गत ऑक्सीजन पार्क व अनुभव मित्र ची विजिट करण्यात आली.
वर्धा : ६ जानेवारी ला ऑक्सीजन पार्क वर्धा येथे अनुभव मित्र ची विजिट करण्यात आली.तसेच ऑक्सीजन पार्क ला पोहोचतात सर्व विद्यार्थ्यांनी झाडांची ओळख व तेथील परिसर ची पाहणी केली.परिसरात वन औषधी वनस्पतीचे झाडे वेगवेगळ्या जातीचे दिसून आले.तसेच तेथील कोणी वाढदिवसानिमित्त, लग्नानिमित्त झाडे लावली आहेत. काडी कचऱ्याचे विल्हेवाट करिता कंपोस्ट खताची निर्मिती केल्या गेली.निसर्गाच्या सानिध्यात बसून बैठक घेतली.व निसर्ग विषयी विषयी विचार मंथन केले.निसर्ग आपल्याला सर्व देतोय आपण निसर्गाला काय देतो आणि निसर्गासाठी काय करत आहोत याविषयी चिंतन करून अनुभव शिक्षा केंद्र च्या मित्र नी श्रमदान करण्यास सुरुवात केली.झाडा जवळील पालापाचोळा गोळा करून,झाडून येथील परिसर स्वच्छ केला.तेथील झाडाला पाणी दिले.पाला पाचोळ्यांचा कंपोस्ट च्या गड्ड्यात विल्हेवाट लावला.त्यानंतर विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात बसून बेलखोडे यांच्या उपस्थितीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली.ऑक्सिजन पार्क चे महत्व ,उद्देश,स्थापना,बेलखोडे यांच्या निसर्ग सेवा समिती यांच्या कडून समजून घेण्यात आले.ऑक्सीजन पार्क येथे विविध वनस्पती झाडे लावण्यात आली आहे.तसेच अभिनव म्हणजे झाडाला क्यूआर कोड लावलेला आहे.क्यू आर कोड मधून झाडांची ओळख,फायदा,उपयोग, माहिती व महत्त्व समजून घेऊ शकते. आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रमदानाच्या माध्यमातून लोकसभागातून हे ऑक्सिजन पार्क उभे करण्यात आले. आनंदाने अनुभव शिक्षा केंद्राच्या साथीनीं श्रमदान केले.व चित्रकला स्पर्धा च्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.तसेच त्यावेळी या श्रमदान व कार्यक्रमाच्या आयोजनाकारिता विशेष सहकार्य वैभव म्हैसकर,शिवानी,धरती,प्रियंका करिश्मा मुनेश्र्वर,अभिषेक,हितेश, गितेश,गायत्री,ऋतिक, पूजा,आदी नी सहकार्य केले. ही विजीट विद्यार्थी व साथींकरिता महत्वपूर्ण ठरली.
सागर झोरे साहसिक न्यूज/24
