आपल्या कार्याने सामाजिक व राष्ट्रीय उन्नतीचा स्तर वाढवावा “अग्रसेन महाराज यांच्या ५१७९ जयंतीचे भव्य आयोजन….

0

🔥आपल्या कार्याने सामाजिक व राष्ट्रीय उन्नतीचा स्तर वाढवावा “अग्रसेन महाराज यांच्या ५१७९ जयंतीचे भव्य आयोजन.

देवळी-/ शहरात राज्यात आणि देशात आपल्या समाजाकडे आदराने पाहिल्या जाते. आपल्या समाजाचे प्रत्येक सामाजिक शैक्षणिक, क्रिडा, धार्मिक आदि कार्यात नेहमी मोलाचे योगदान असते. या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजन पैशाकडे धावत आहे. आपल्या आयुष्यात एक मर्यादेत पैशा सोबत चांगले संस्कार सद्‌गुण चरित्रशिलता,परोपकारिता तथा पुण्याईची ही कमाई केली पाहिजे. समाजात आजही असे पुष्कळ लोक आहे ज्यांना मदतीची आवश्यकता आहे. म्हणुन आपण सर्वांनी श्री अग्रसेनजी चे कार्याचे अनुकरण करून आपल्या कार्याने सामाजिक व राष्ट्रीय उन्नतीचा स्तर वाढवावा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्योजक व महाराष्ट्र राज्य अग्रवाल संम्मेलनाचे कार्यकारी अध्यक्ष रमाकांतजी खेतान यांनी केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी चंद्रपुरचे उद्योजक व लायंस क्लबचे माजी डिस्ट्रीक्ट गवर्नर शैलेशजी बागला, महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला बजाज, वाचनालयाचे सचिव गौरीशंकर टिबडेवाल मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन समाजसेवी मोहनबाबु अग्रवाल हे उपस्थित होते.

या प्रसंगी प्रमुख अतिथी शैलेश बागला म्हणाले की आपल्या समाजात असलेल्या कुरीती आणि देखावा व जास्तीचा खर्चा कमी करण्यात आला पाहिजे. समाजाकरिता संघटन अती आवश्यक आहे. पुर्ण भारत देशात आपल्या समाजाची संख्या अंदाजे साडे सहा कोटी असुन ही राजनैतीक पदावर आपली संख्या नगण्य आहे. यावेळी मोहनबाबु अग्रवाल आणि शशिकला बजाज यांचे ही भाषण झाले.

सुरुवातीला श्री अग्रसेन महाराज यांच्या प्रतिमेला रथावर सजवून बालाजी मंदिरातुन गाजा बाजाने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी सार्वजनिक बजाज वाचनालयात पोहचल्यावर तेथे महालक्ष्मी माता आणि श्री अग्रसेनजी महाराज यांचे पुजन करुन सामुहिक आरती करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ स्मृतीचिन्ह देवून करण्यात आले. महिलाव्दारे स्वागत गीतांनी ही पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. समाजातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार गोविंदजी भुत व्दारे श्रीमती पुष्पादेवी विश्वनाथ भुत स्मृतीत दिलेले चांदीचे पदक देवून पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. चार दिवस सुरु असलेली विभीन्न स्पर्धेत विजयी स्पर्धकांना पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन शैलेश सिन्हल व प्रतीक भुत यांनी केले. प्रास्ताविक अशोक लेकरीया यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सृष्टी टिबडेवाल डॉ. आशिका सिंघानीया आणि डॉ. खुशी बजाज यांनी केले. आभार प्रदर्शन आनंद सराफ यांनी केले. शेवटी सामाजातील ७८ कलाकारांनी भाग घेतलेली एक सुंदर नाटिका” गीता का सार, जीवन का आधार” प्रस्तुत करण्यात आली आणि सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या ४ दिवसीय भव्य आयोजनाला सफल करण्याकरिता अग्रसेन नवयुवक मंडळ, नवयुवतीमंडळ आणि समस्त समाज बांधवांचे सहकार्य लाभले.

सागर झोरे साहसिक News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!