वर्धा / आयटक कामगार केंद्र वर्धा येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीने आज 14 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांची 133 वी जयंती आयटक कामगार केंद्र वर्धा येथे आयटक जिल्हा अध्यक्ष काँ. मनोहर पचारे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे,कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत डकरे तर प्रमुख अतिथी म्हणून नंदकुमार वानखेडे एमएसईबी वर्कस फेडरेशनचे अरविंद डबुरकर राजेश फाले कॉम्रेड मैना उईके मला भगत अलका भानसे विनायक नन्नोरे अरुणा नागोसे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे म्हणाले की डॉ.भीमराव आंबेडकर यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष समजून घेण्याची गरज आहे कशासाठी केला त्यांनी विविध भाषणात काय सांगितलं हे समजून घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे वाचन करणे गरजेचे आहे त्यामुळे आयटक च्या वतीने दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले तथा बाबासाहेब आंबेडकर च्या विचारांच्या पुस्तकाचे वाचन करणे आणि बाबासाहेब आंबेडकराला समजून घेणे ही काळाची गरज आहे देशाला बाबासाहेबांनी दिलेले मूलतत्त्व हे टिकले पाहिजेत त्याचे जतन केले पाहिजेत यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या त्यागाचा बलिदानाचा विसर न पडू देता आम्हा सर्व कामगार कष्टकऱ्यांनी पुस्तके वाचली पाहिजेत. अनेक बुद्धिवंत व्यक्ती नेहमी सांगत असतो की बाबासाहेबांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतलं पाहिजे वाचाल तर टिकाल आणि टिकाल तर जगाल म्हणून आयटक परिवाराच्या वतीने 14 एप्रिल रोजी कामगार कष्टकऱ्यांना जनतेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची दरवर्षी 100 पुस्तके वाटप करुन आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात येत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणणे हिच खरी जयंती होय असे स्पष्ट मत आयटक राज्य सचिव कॉ. दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मला पण करून व पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत डकरे यांनी केले.याप्रसंगी गोदावरी राऊत सुषमा ढोक चंदा अतकरी नलू टिपले नंदा मोहरकर रत्नकला ढगे चंदा तामगाडगे यांनी आपले विचारही व्यक्त केले
त्यानंतर उपस्थितीत कामगारांना शंभर पुस्तके वाटप करण्यात आले व ती पुस्तके वाचावीत याचा आग्रह करण्यात आला वाचून झाल्यानंतर इतरांना द्यावे असेही सूचित करण्यात आले.संचालन माया तितरे तर आभार प्रदर्शन एडवोकेट नंदकुमार वानखेडे यांनी केले.