आरोपी प्रीतम सहारेच्या समर्थनार्थ एकवटले नागरिक.

0

🔥सिंदी पोलीस स्टेशन वर धडकला भव्य मोर्चा.

🔥 दलित युवकाला बेधम मारहाण करून काढली होती धिंड.

🔥 दोषी आरोपींवर कारवाई न केल्यास नागरिकांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

सिंदी (रेल्वे) : येथील नंदा नदी जवळ असलेल्या माता मंदिर परिसरात मुलींची छेड काढून अश्लील चाळे केल्याप्रकरणी आरोपी प्रीतम सहारे यास नागरिकांनी अमानुष मारहाण करून त्याची अर्धनग्न शहरात धिंड काढली. परंतु, आरोपी प्रीतम सहारे यांची वर्तणूक प्रभागात समाजाप्रती तसेच जनसामान्यांमध्ये चांगली आहे. तसेच आरोपीला नागरिकांनी अमानुष मारहाण करून शहरात अर्धनग्न धिंड काढणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी, आरोपी प्रीतम सहारे यांच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले असून बुधवारी रात्री सामाजिक कार्यकर्ते गजानन पोईनकर व सचिन पेटकर यांच्या नेतृत्वात सिंदी पोलीस स्टेशनवर भव्य नागरिकांचा मोर्चा धडकला.आरोपी प्रीतम सहारे हे दलित असून मागील 12 वर्षांपासून सिंदी शहरात वास्तव्यास आहे. एक ते दीड वर्षांपासून पत्नी व दोन लहान मुलांबरोबर बेघरवस्तीमध्ये कांबडे यांच्या घरी किरायाने राहतात. त्यांची वर्तणूक प्रभागात समाजाप्रती तसेच शहरात चांगल्या प्रतीची आहे. त्यांना कधीही वार्डात भांडण तंटा करताना नागरिकांनी पाहिले नाही. दिनांक 29 डिसेंम्बर 2023 रोजी नंदा नदी जवळ माता मंदिर परिसरात मुलींची छेड काढून अश्लील चाळे केल्या प्रकरणी सिंदी पोलिसात गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे. परंतु, ज्या प्रभागात आरोपी प्रीतम सहारे राहतात तिथे त्यांची लोकांमध्ये चांगली उत्तम छबी आहे. समाजामध्ये त्यांची वागणूक चांगली असल्याने त्यांच्याविरुद्ध सिंदी पोलिसात कोणतीही तक्रार दाखल नाही. एक महिन्यापासून मुलींची छेड काढत अश्लील चाळे केल्याचा आरोप प्रीतम सहारेवर आहे.परंतु, त्याप्रकरणी मुलींची, पालकांची तसेच शिक्षकांची सिंदी पोलिसात तक्रार नाही. विशेष म्हणजे घटने संदर्भात आरोपीविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसतांना प्रीतम सहारेला सकाळी स्टेशन परिसरातून प्रदीप कनोजे याने पकडून शाळेच्या आवारात आणून नागरिकांनी त्यास कपडे फाटतपर्यंत मारहाण केली. एवढेच नाही तर त्याची शहरात धिंड काढली. या घटनेचा व मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. परंतु, पोलिसांनी आरोपीला अमानुष मारहाण करून अर्धनग्न धिंड काढणाऱ्या गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई न केल्याने बुधवारी सायंकाळी 7 वाजता गजानन पोईनकर व सचिन पेटकर यांच्या नेतृत्वात शहराच्या मुख्य मार्गाने पोलीस स्टेशनवर धडकला. मोर्चामध्ये जवळपास एक हजार नागरिक उपस्थित असून यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. दरम्यान,यावेळी पाच लोकांचे शिष्टमंडळ आतमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक वंदना सोनवणे यांच्याशी चर्चा केली. यावेळी 181 नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.
शहरातील काही गावपुढाऱ्यांनी येणाऱ्या स्थानिक न.प.च्या निवडणुकीवर डोळा ठेवून प्रभागात स्वतःची छबी चमकविण्याकरिता रचलेला कट आहे. असे निवेदन कर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आरोपी प्रीतम सहारे यांच्यावर केलेले आरोप हे आधारहीन आहेत.त्यांची जनसामान्यांत चांगली प्रतिमा असून आरोपी प्रीतम सहारे यांना अमानुष मारहाण करून त्यांची शहरात अर्धनग्न धिंड काढणाऱ्या आरोपींवर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली.

दोषी आरोपींवर गुन्हे दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू.

29 डिसेंम्बर रोजी माता मंदिर परिसरात मुलींची छेड काढून अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रीतम सहारे विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. मात्र, आरोपीला कपडे फटतपर्यंत अमानुष मारहाण करून शहरात अर्धनग्न धिंड काढणाऱ्या आरोपींवर अद्यापही सिंदी पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही. आरोपी प्रीतम सहारे यांची वर्तणूक प्रभागात समाजाप्रती चांगली आहे. त्याला प्रभागात कधीही वाद घालतांना तसेच छेड काढतांना कधीही पाहिले नाही.
परिणामी, 8 जानेवारीपर्यंत दोषी आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखलकेल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. त्यामुळे होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही सिंदी पोलिसांची राहील.सचिन पेटकर सामाजिक कार्यकर्ता, सिंदी (रेल्वे)

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज/24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!