आर्वी व देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघासाठी अनंत देशमुख यांची वर्धा जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

0

🔥आर्वी व देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघासाठी अनंत देशमुख यांची वर्धा जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

देवळी -/ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे हिंगणघाट येथील शिवसेना कार्यालयात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक २१ मे २०२६ रोजी ‘सामना’ दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या नियुक्तीनुसार आर्वी व देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघासाठी अनंत देशमुख यांची वर्धा जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर अनंत देशमुख यांनी हिंगणघाट येथे उपस्थित राहून वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख अशोक शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी अशोक शिंदे यांनी शुभेच्छा देतांना सांगितले कि पक्षाच्या कार्यासाठी आपले अमूल्य योगदान देऊन पक्ष प्रमुख उध्दव साहेबांचे हात बळगट कराल आणि आर्वी, देवळी- पुलगाव विधानसभा मतदारसंघात शिव सेनेच्या कार्यकर्ता, पदाधिकारी व नव युवकांमध्ये नव चेतना पक्षा प्रति निर्माण कराल अशी मला व पक्षाला मनापासून खात्री आहे. तसेच अनंत देशमुख यांना पुढील वाटचालीसाठी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी तालुकाप्रमुख मनीष देवडे, उपतालुकाप्रमुख प्रकाश अणासाने, देवळी येथील घनश्याम वाडतकर, विलास निवल, अतुल अंबरकर, शीतल चौधरी, श्रीधर कोटकर, शंकर मोहमारे, गजानन काटोले, सुभाष काटकर तसेच इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         सागर झोरे साहसिक        News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!