आर.के.एस.इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात,पालकांकडून शाळेच्या उपक्रमांचे कौतुक…..

0

🔥आर.के.एस.इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात,पालकांकडून शाळेच्या उपक्रमांचे कौतुक.

यवतमाळ-/ यवतमाळ शहरातील राऊत नगर येथील आर. के. एस. इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन भावे मंगल कार्यालय, यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले.या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून मंजुषा व्ही. डंभारे (शालेय पोषण आहार अधिकारी, बाभुळगाव), सौ. श्रद्धा शिंदे (अध्यक्षा, तेजस्विनी अर्बन बँक, यवतमाळ) तसेच मॅनेजमेंट हेड प्रमोद शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली. “यशाच्या शिखराकडे – Pinnacle Reaching New Heights” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन व नाट्य सादरीकरणातून आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवले. विशेष बाब म्हणजे, या सांस्कृतिक कार्यक्रमात काही पालकांनीही सहभाग नोंदवत आपल्या कलांचे सादरीकरण केले, ज्यामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी संदीप पद्मनाथ अपोथे व चिन्मयी गजानन कांबळी यांचा मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमादरम्यान नर्सरी विभागाच्या पालक मोनिका दुधे यांनी शाळेच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्चना सानप यांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. शिक्षकांकडून घेतल्या जाणाऱ्या मेहनतीमुळेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या प्राचार्या स्मिता बोंकिनपिल्लेवार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच टिचिंग व नॉन-टिचिंग स्टाफ यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. वर्षभर विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी शर्मा, कल्याणी जवळेकर व रिंकू वीर यांनी केले, तर किरण पुरम यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे आभार मानण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, आनंददायी व उत्साही वातावरणात पार पडला.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ-वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!