🔥इतवारा बाजार परिसरात हातात धारदार चाकू घेऊन दहशत निर्माण करणारा इसमावर वर्धा शहर DB पथकाची कारवाही,धारदार चाकू जप्त.
वर्धा -/ वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने प्रभावी कारवाई करीत इतवारा बाजार परिसरात हातात धारदार चाकू घेऊन आरडाओरड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमास शिताफीने ताब्यात घेतले आहे. सदर इसमाकडून अंदाजे ३०० रुपये किमतीचा धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, वर्धा शहर पोलीस स्टेशनचे डी.बी. पथक माननीय पोलीस निरीक्षक श्री. नागेश कुमार चतुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा शहर पोलीस स्टेशन हद्दीत नियमित पेट्रोलिंग करीत असताना इतवारा बाजार परिसरात डी.बी. पथकास गोपनीय खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, एक इसम इतवारा बाजार पोलीस चौकीच्या बाजूला हातात धारदार चाकू घेऊन आरडाओरड करीत असून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.
सदर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डी.बी. पथकाने तात्काळ आवश्यक पंचांची व्यवस्था करून घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मिळालेल्या माहितीप्रमाणे एक इसम हातात धारदार चाकू घेऊन दहशत निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सदर इसमास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक धारदार चाकू मिळून आला. सदर चाकू पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव विश्वास नंदकिशोर पसारी, रा. महाकाली डॅम, ता. आर्वी, जि. वर्धा असे सांगितले. सदर इसमाविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये कलम ४ व २५ अन्वये कायदेशीर कारवाई करून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची दमदार कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. शौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव बागमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक, वर्धा शहर पोलीस स्टेशन श्री. नागेश कुमार चतुरकर यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, पोलीस हवालदार अभिजीत वाघमारे, पोलीस अंमलदार रंजित भुरसे व पोलीस अंमलदार अमोल सालवन यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.