केळझरचे कनिष्ठ अभियंता हेमंतकुमार दलाल यांची हकालपट्टी करा.

0

           
🔥 काँग्रेसचे सिंदी शहर अध्यक्ष डफ यांची मागणी
🔥 २१ दिवसांपासून शेतीचा विद्युत पुरवठा बंद
🔥 अभियंत्याच्या हेकेखोर वृत्तीला वैतागले शेतकरी

सिंदी (रेल्वे) : केळझर उपविभाग सेलू येथील कनिष्ठ अभियंता हेमंतकुमार दलाल यांचा मनमानी व बेजबाबदार कारभारामुळे मौजा सेलडोह व डोरली येथील शेतकरी संकटात सापडले आहे.मागील २१ दिवसांपासून डोरली शिवारातील शेती पंपाचा विद्युत पुरवठा बंद आहे. यासंदर्भात तक्रार करूनही अद्यापही विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे.करीता येथील बेजबाबदार कनिष्ठ अभियंता दलाल यांची चौकशी करून हकालपट्टी करण्याची मागणी सिंदी शहर काँग्रेस कमेठीचे अध्यक्ष प्रकाशचंद्र डफ यांनी निवेदनातुन केली आहे.
सेलू उपविभाग अंतर्गत केळझर येथील कनिष्ठ अभियंता हेमंतकुमार दलाल यांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत सेलडोह आणि डोरली मौजातील शेतात झाड पडल्यामुळे खांबावरील तारा तुटल्या आहेत.त्यामुळे याभागातील शेतीचा विद्युत पुरवठा मागील २१ दिवसांपासून बंद आहे.या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या असून विद्युत पुरवठा दुरुस्तीसाठी केळझर येथील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु, अभियंता दलाल हे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दलाल यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता फोन उचलत नाही. एखाद्या वेळेस फोन उचलला तर शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागणूक दिली जात असल्याचे शेतकरी सांगतात.
यंदा अतिवृष्टीमुळे शेतातील काही शेतकऱ्यांच्या विहिरी तुडूंब भरल्या असल्याने विहितुन पाणी वरून वाहत आहे.त्यामुळे शेताचा ओलावा कमी तसेच पाझर कमी करण्यासाठी मोटार पंपाच्या साह्याने विहिरीचे पाणी तोडून सोयाबीन व फळझाडे सारखी पिके वाचविण्याचा प्रयत्न करने आवश्यक असल्याने विजेची गरज आहे. विद्युत तारा न जोडल्याने विद्युत पुरवठा बंद आहे. यासाठी अभियंता दलाल यांना फोन केला तर हे फोनच उचलत नाही. फोन उचलला तर शेतकऱ्यांशी उर्मट पणे बोलून अधिकारी पनाचा तोळा दाखवतात.अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे. हीच अवस्था डफ यांची सुद्धा झाली आहे.या भागातील लाईनमन सचिन धोटे यांना डफ यांनी फोन करून तक्रार केली. त्यामुळे लाईनमन धोटे यांनी झाडे तोडून लाईन मोकळी करण्यासाठी अतिरिक्त कंत्राटी कामगारांची मागणी अभियंता यांच्याकडे केली परंतु, लेटलतिफी आणि स्वमार्जिने कारभार हाकणारा कनिष्ठ अभियंता दलाल यांनी माणसे पुरविली नाही,असे डफ यांनी बोलतांना सांगितले.
मागील २१ दिवसांपासून या भागातील शेतीचा विद्युत पुरवठा बंद असल्याने जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरीतील पाण्यामुळे पिके सडण्याच्या अवस्थेत आहे. परंतु, दलाल जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे केळझर येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता दलाल यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे या भागातील शेतकरी चांगलेच वैतागले असून या मुजोर अभियंत्याची सखोल चौकशी करून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसचे सिंदी शहर अध्यक्ष प्रकाशचंद्र डफ यांनी निवेदनातून केली आहे.

      दिनेश घोडमारे,साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!