केळझर जवळ पुन्हा दुचाकीच्या अपघातात १ ठार एक गंभीर जखमी

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
वर्धेकडे भरधाव जाणारी दुचाकी मोपेड गाडी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री सात वाजताचे सुमारास केळझर जवळ वर्धा नागपूर महामार्गावर आदिनाथ ढाब्यासमोर घडली, अक्षय पाटील वय 28 रा, वर्धा असे मृतकाचे तर शुभम चंद्रकांत लोखंडे वय 25 रा, अंबोडा जिल्हा वर्धा असे जखमीचे नाव आहे,
अक्षय व शुभम हे दोघेही प्लेझर मोपेड गाडीने वर्धेकडे जात होते, दरम्यान केळझर जवळ वर्धा नागपूर महामार्गावर आदिनाथ ढाब्यासमोर त्यांचे वाहन अनियंत्रित होऊन दोघेही रोडवर पडले, त्यात अक्षयचा जागीच मृत्यू झाला तर शुभम हा गंभीर जखमी झाला, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतकाला व जखमीला रुग्णवाहिकेने सेवाग्राम रुग्णालयात पाठविले, अपघातातील मोपेड गाडी रोडपासून काही अंतरावर झुडुपात गेली होती, वर्धा नागपूर मार्गावर या दोन दिवसातील हा दुसरा अपघात आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!