खलबत्याने वार करित वेडसर भाच्यानेच केली मामाची हत्या.
मृतक सुधाकर जनार्दन लोहवे
आकोली हेटी येथील घटना
वर्धा : अकोली येथील बाजार घेउन घरी आलेल्या मामा सुधाकर जनार्दन लोहवे वय 48 याच्यावर भाचा संघपाल विनोद भोंगाडे वय 22यानी खलबत्यांनी वार करित मामालाच संपवीले प्राप्त माहितीनुसार, सुधाकर लोहवे हे सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी करित असतांना भाचा संगपाल यानी अचानक मागुन येउन खलबत्यानि वार करत मामालाच संपवील्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी 6.30च्या सुमारास घडली.मृतक सुधाकर लोहवे यांचा मनोरुग्न्ं भाचा संघपाल त्यांच्या स्वयंपाक घरात आला असुन त्याने मामाच्या डोक्यात खलबत्यने वार करित मामाला जागीच ठार केले सदर बाब लक्षात येताच गावात मोठी खळबळ उडाली सदर घटनेची माहिती मृतक सुधाकर लोहवे यांचा भाऊ जिवन लोहवे यांनी सेलू पोलिसांना दिली असता तात्काळ सेलू पोलिस निरिक्षक तिरुपती राणे उपनिरीक्षक निमगडे तसेच गणेश राऊत देवा वनवे घटनेच्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी आरोपीस यास ताब्यात घेत घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मध्ये पाठविला आरोपी संगपाल याच्या कडे मनोरुग्न असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट असल्याचे कळते व तो नियमित अश्याच प्रकारे लहाना मोठ्यावर धाऊन जात असल्याचे कळते.आज देखील त्याने मामावर अश्याच प्रकारे हल्ला करित त्यात त्यांचा मृत्यु झाला.सदर घटनेमुळे मात्र शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त होत आहे
गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज-24