ग्रामपंचायत कामगारांचे काम बंद आंदोलन, पंचायत समिती समोर कामगारांचा ठिया.

0

पंचायत समिती समोर कामगारांचा ठिया.

देवळी : तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत मधील कार्यरत कामगाराने आपल्या विविध मागण्यांसाठी ३ दिवसीय काम बंद आंदोलन पंचायत समिती समोर ठीया मांडून आंदोलन सुरू केले आहे. ग्रामपंचायत मधील काम करणारे शिपाई,लिपिक,पाणीपुरवठा कर्मचारी, जलसुरक्षक,यांचा समावेश असलेल्या कर्मचाऱ्यांनी वेतनश्रेणी मंजूर करणे, निवृत्ती वेतन लागू करणे,भविष्य निर्वाह निधी,सुधारित किमान वेतन,थकीत किमान वेतन,या मागण्यांचा निवेदनामध्ये गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये मागण्यांचा समावेश आहे.काम बंद आंदोलन १८ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कामे बंद ठेवून ग्रामपंचायत कामगार सेना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे.या आंदोलनामध्ये अध्यक्ष सुरज डुकरे,सचिव विशाल जाधव,उपाध्यक्ष निरंजन रामटेके, सचिन जाधव,नरेश सोनवणे,रोशन करूलूके,पंकज झोड,प्रशांत होले,शंकर पांडे,सतीश मरसकोल्हे,अमोल अडेकर,त्यांच्यासह इतर कामगारांचा काम बंद आंदोलना मध्ये सहभाग आहे.फोटो ओळी पंचायत समिती समोर काम बंद आंदोलन करीत असलेले कामगार सेनेचे कर्मचारी

सागर झोरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!