जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला कारणे दाखवा नोटीस
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी ग्रामीण भागात हक्काच्या जागेवर घर उभारले जावे यासाठी समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय गृहनिर्माण योजना राबविण्यात आली. यातून अनेकांना जागा उपलब्ध झाली पण मिळविलेला जागेचा लाभ परस्पर विकून बक्कळ पैसे कमविण्याचे प्रकार देखील समोर आले आहे. यासाठी समाज कल्याण आयुक्तांनी वर्ध्याच्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाला कारणे दाखवा नोटीस बाजवले आहेय. अनेक तक्रारी नंतर आता या मागासवर्गीय गृहनिर्माण मधील भुखंड विक्रीची चौकशी झाली खरी पण यात दुय्यम निबंधक कार्यालय हात ओले करून विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. बोरगाव, सेवाग्राम या गावासह इतरही गावात ही योजना राबविण्यात आली. योजनेत बोरगाव येथील संत गाडगेबाबा मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था, लुम्बिनी मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था, मातोश्री मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था,या सारख्या संस्था स्थापन करण्यात आल्या. 30 ते 40 च्या घरात सभासद संख्या असणाऱ्या या गृह निर्माण संस्थांमध्ये सभासद नेमून गरजूंना लाभ मिळाला पण अलीकडच्या काळात नोंदणी विभागात लाभार्थ्यांना मिळालेले घरपट्टे परस्पर विकले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आत एफ आय आर दाखल होतो की पुढे काय होते तेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.