डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने कॅप्टन मोहन गुजरकर,कॅप्टन गुजरकर तरूणांकरीता प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व,मोहनबाबू अग्रवाल
अविनाश नागदेवे
सहासिक-न्यूज/24
देवळी : चार भिंती आत दिल्या जाणाऱ्या शिक्षणासोबतच शाळा-महाविदयालयाच्या बाहेर दिल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या शिक्षणाने तरूण तरुणींचे व्यक्तिमत्त्व घडत असते.या दृष्टिकोनातून कॅप्टन मोहन गुजरकर यांनी आपल्या इंग्रजी विषयाच्या अध्यापनासोबत राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट व गाईड, प्रहार संस्थेच्या साहस व सामाजिक उपक्रमात अनेक तरूण तरूणींना सहभाजी करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविलेले आहे.खऱ्या अर्थाने आज अश्याच शिक्षकांची नितांत गरज असून कॅप्टन गुजरकर आजच्या तरुणां करीता प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे,असे प्रतिपादन स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी. सभागृहात आयोजित कार्यक्रमात जेष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांनी १७ सप्टेंबर रोजी केले.हिंगणघाटच्या किड्स ब्राईट फ्यूचर स्पोर्टिग क्लब द्वारा दिला जाणारा डाॅ. सर्वे पल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी कॅप्टन मोहन गुजरकर गुजरकर यांना जाहीर झाला होता.सदर कार्यक्रमास अनुपस्थित असल्यामुळे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयात जावून कॅप्टन मोहन गुजरकर यांना स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, किड्स ब्राईट फ्यूचर स्पोर्टिग क्लबचे अध्यक्ष मुस्तफा बखश, राजू लभाने, नरेश अग्रवाल, राजेश धोपटे व सत्कारमूर्ती कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकात इमरान राही म्हणाले आज समर्पित भावनेतून अध्यापन व सर्वागिण विकासावर भर देणाऱ्या शिक्षकांची समाजाला नितांत गरज असून कॅप्टन गुजरकर या दृष्टिकोनातून सातत्याने शाळा-महाविदयालयाच्या मुलांमुलीना विविध उपक्रमात सहभागी करून त्याचे व्यक्तिमत्त्वात बदल करून आदर्श नागरिक घडविण्याचे राष्ट्रीय कार्य करीत आहे, हे आपल्याकरीता भूषणावह बाब आहे.कॅप्टन गुजरकर यांनी गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक व महाराष्ट्र रोव्हर व रेंजर स्काऊट चे राज्य समन्वयक म्हणून पदभार सांभाळलेला असून त्यांना महाराष्ट्र शासनाने सन २०१७ च्या ‘राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. याशिवाय श्री.गुजरकर यांना भारत स्काऊटस व गाईड्स च्या राष्ट्रीय कार्यालयातर्फे
उपराष्ट्रपती पुरस्कार, लक्ष्मी मुजूमदार राष्ट्रीय पुरस्कार तर एन.सी.सी.च्या वतीने ‘बेस्ट एन.सी.सी. अधिकारी पुरस्कार” प्राप्त झालेला आहे.संचालन सार्जंट वैष्णवी शिरभाते तर आभार अंडर ऑफिसर राखी खोडे हिने मानले. यशस्वीतेकरीता रोव्हर योगेश आदमने, अंडर ऑफिसर अक्षय जबडे, शेखर भोगेकर, नैना गवळी, रसिका बानकर, प्रतीक क्षीरसागर व छात्र सैनिकांनी प्रयत्न केले.