डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी नूतन राऊत तर महासचिव पदी शारदा झांबरे यांची सर्वानुमते निवड

0

प्रतिनिधी / वर्धा :

डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव सामीती वर्धा मार्फत दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याकरीता एक समितीची निवड केल्या जाते . त्या समितीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून आज पर्यंत पुरुषांना स्थान देण्यात आले होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्याकरिता पुरुषांसोबत महिलांचा सुद्धा बरोबरीचा सहभाग असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर उत्सव समिती ने यावर्षी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या तसेच जिल्हा परिषद सदस्य नूतन राऊत यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड केली , तर आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या शरदा झाम्बरे यांची निवड महासचिव पदी व आंबेडकरी चळवळीतील धडाडीच्या कार्यकर्त्या वैशाली पाटील यांची कार्याध्यक्ष पदी निवड आरपीआयचे नेते वसंत भगत यांच्या अध्यक्षते खाली सर्वानुमते निवड करण्यात आली . या सर्वांच्या खांद्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करण्याची धुरा आंबेडकरी अनुयायांनी दिली असून सर्व समितीचे सदस्य ही धुरा योग्यपणे सांभाळेल व त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व बौद्ध उपासक-उपासिका यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!