तोंडापूर परिसरात दोन शेतकऱ्यांचा आत्महत्या

0

By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/जळगाव:
जामनेर तालुक्यातील तोंडापूर व कुंभारी खुर्द येथील शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या खळबळजनक घटना दोन दिवसात दोन घटना घडल्या आहे.
तोंडापूर येथील शेतकरी विनोद एकनाथ काकार वय ३८ यांनी शेती च्या मशागत साठी विविध कार्यकारी सोसायटी मधून कर्ज घेतले होते. शेतातील पिक हाती न आल्याने डोक्यावर कर्ज डोंगर वाढत असल्यामुळे नैराश्य येवून राहत्या घरात विषारी औषधी प्राषन आत्महत्या केली. त्यांना एक मुलगा पत्नी आहे औषधी पिल्याने त्याना जळगाव येथे उपचारासाठी नेले होते परंतु डॉक्टरांनी मुत्य घोषित केले. तर दिनाक १ जून रोजी कुंभारी खुर्द येथील शेतकरी बळीराम नथु चव्हाण वय ४९ यांनी स्वताच्या शेतात दुपारी ३ वाजेच्या दरम्यान विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केली.तात्काळ जळगाव येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मुत्य घोषित केले. त्याच्या मागे पत्नी, या आत्महत्या मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!