दुचाकी चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
क्राईम प्रतिनिधी / वर्धा:
करंजी भोगे येथील प्रकाश भाऊराव कौरती, वय ४० यांनी त्यांची जुनी वापरातील मोटारसायकल क्रमांक एमएच-३२/एसी-२६६७ चे पेट्रोल संपल्याने नागापूर येथे मंदिराजवळ उभी करून पेट्रोल घेण्यासाठी सेवाग्राम येथे आले व वापस नागापूर येथे आले असता त्यांना त्यांची मोटारसायकल दिसून आली नाही तेव्हा त्यांनी गावात व इतरत्र ठिकाणी गाडीचा शोध घेतला असता मिळून न आल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पो.स्टे. सेवाग्राम येथे अ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरू असताना मिळालेल्या माहितीवरुन आरोपी किशोर सुंदरसिंग चौधरी, वय ३० वर्ष, रा. समता नगर, वर्धा यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडून वर नमूद गुन्ह्यातिल चोरी गेलेली एक हिरो होंडा पॅशन एमएच-३२/एसी-२६६७ किंमत ३०,०००/- रू जप्त करून सदर गुन्हा उघडकीस आणला.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सपोनि महेंद्र इंगळे यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि सौरभ घरडे, पोउपनि गोपाल ढोले, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टणकर यांनी केली