देवळी /भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देवळीतील विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.यामध्ये नगरपरिषद सामोरील पुतळ्याजवळ बौद्ध बांधवांनी गोळा होऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माला अर्पण करून मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.तसेच आंबेडकर नगर विहार,खाडे लेआउट विहार, इंदिरा नगर बुद्ध विहार,केदार लेआउट बुद्ध विहार,मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून मिठाई वाटप तसेच भीम गीत,बाबासाहेबांचा परिचय व कार्य या विषयी समाजातील भंते आणि समाज प्रमुखांनी त्यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.तसेच त्यांच्या प्रतिमेसह शहरामध्ये मिरवणूक काढून आनंद व्यक्त करण्यात आला.मिरवणुकीमध्ये बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.डॉ बाबासाहेब जयंतीनिमित्त देवळीतील विविध ठिकाणावर मिठाईवाटप व फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच देवळी पोलीस स्टेशन मध्ये प्रथमच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम ठाणेदार सार्थक नेहाते यांनी आयोजीत केले होते.यावेळी पोलीस विभागातील कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माला अर्पण करून मिठाईवाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे देवळी तहसील कार्यालय तसेच शासकीय कार्यालयात,व संस्थानांमध्ये व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सचिव व सदस्य,शैक्षणिक संस्थांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.