देवळी तालुक्यातील ग्रामपंचायत सर्व निवडणूक निकाल.

0

देवळी : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक काल पार पडली तालुक्यातील दिघी व बोपापूर या दोन ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला दिघी येथे युवा संघर्ष मोर्चा तर बोपापूर येथे काँग्रेसने बाजी मारली.दिघी येथे संदीप दिघीकर हे तर बोपापूर येथे विनोद दांदळे हे सरपंच पदी निवडून आले.दिघी व बोपापूर येथे सरपंच व सदस्यांच्या निवडणुकीत यापूर्वी असलेल्या सत्तारूढ गटाला पराभूत करून काँग्रेसने व युवा मोर्चा ने बाजी मारली युवा संघर्ष मोर्चा प्रथमच निवडणूक रिंगणात उतरून पाच जागी उमेदवार विजयी करण्यात यशस्वी ठरले. सरपंच पदी संदीप दिघीकर तर वनिता खडसे,रेखा आडे,विजय दाबले,रमा जवादे, दीपक गावंडे,प्रशांत कुमरे,व शालू खराबे,हे सदस्य म्हणून निवडून आले तर बोपापूर येथे सरपंच पदी विनोद दांदळे तर सदस्य पदी सविता पचारे,ममता गेडाम, नीलिमा भोकरे,अनिल पचारे, प्रवीण वाटकर,व सुनिता पीसुड्डे निवडून आले हे सर्व काँग्रेस समर्थित असल्याचे बोलले जात आहे.निवडणूक शांततेने पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए आर राठोड यांनी काम बघितले विजयी उमेदवारांनी ढोल ताशाच्या निनादात गुलाल उधळत व फटाक्यांची आतिश बाजी करीत मिरवणूक काढली यावेळी पोलीस बंदोबस्त चोक होता..

सागर झोरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!