मतदान यादीत घोळ,मतदार झाले त्रस्त..मतदान केंद्रावर सोई सुविधांचा अभाव..
देवळी /शहरात शुक्रवारी लोकसभेच्या मतदानास सकाळी सात वाजता पासून सुरुवात झाली असून सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मतदार मतदान केंद्रावर येण्यास सुरुवात झाली.परंतु सकाळी आठ वाजताच्या दरम्यान यशवंत कन्या शाळा बूथ क्रमांक(१८५)मध्ये वर्धा लोकसभेचे खासदार मतदान करण्यास गेले असता ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे ३६ मिनिटे खासदारांना मतदान करण्यासाठी वाट बघावी लागली ईव्हीएम मशीन दुसरी लावल्यानंन्तर मतदान सुरळीत सुरू झाले तसेच खासदारांनी मतदान केले.त्यामुळे शासनाची तारंमबळा उडाली होती सकाळी उत्साहाने निघालेल्या मतदारांमध्ये तेव्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली कारण अनेकांची नावे मतदार यादीत नावेच दिसली नाही त्यांना शहरातील अनेक बुथ केंद्रावर चकरा मारून आपले नाव शोधावे लागले काहींना आपले नाव न मिळाल्यामुळे त्यांना मतदान न करता घरी परत जावे लागले.याविषयी देवळी चे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की ज्यांचे नाव मतदान यादीत नाही त्यांना यावेळेस मतदान करता येणार नाही जेव्हा मतदार यादी प्रसिद्ध झाली होती नागरिकांनी तेव्हाच आपले नावे शोधायला हवे होते यावरती आता काहीच पर्याय नाही असे त्यांनी सांगितले.परंतु हे गडबड झाली कशी असे विचारल्यावर त्यांनी असे सांगितले की सध्या मी काही बोलू शकत नाही मी याविषयी नंतर बोलील परंतु ज्यांचे नाव मतदार यादीत आले नाही त्यांनी यादी बनवणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी मतदार नागरिकांनी केली.तसेच मतदान बूथ केंद्रावर मतदारांना पाणी पिण्याची व्यवस्था नव्हती तसेच बुथ क्रमांक १८५ समोर पेनडॉल नसल्यामुळे मतदारांना उन्हेमध्ये रांगेत उभे राहावे लागले मतदारांनी नाराजी व्यक्त केली.काही बूथ केंद्राच्या अंदर जाऊन राजकीय पक्षाचे पुरुष व महिला मतदारांना आपल्या पक्षाला मतदान करण्याविषयी सांगत असल्याचे फेरफटका मारला असता दिसून आले.तसेच शहरातील सर्व बूथ केंद्रावर सुरक्षा व्यवस्था चांगली असल्याचे दिसून आले.