धावत्या ट्रक ला आग गुह सैनिकांच्या व पोलिसांच्या मदतीने मोठी दुर्घटना टाळली,आष्टी बस स्टॅन्ड परिसरात घडली घटना. 

0

🔥धावत्या ट्रक ला आग गुह सैनिकांच्या व पोलिसांच्या मदतीने मोठी दुर्घटना टाळली.🔥आष्टी बस स्टॅन्ड परिसरात घडली घटना.

नरेश भार्गव,आष्टी शहीद -/ मध्य प्रदेश राज्यातून वरुड व तेथून आर्वी येथेजाण्यासाठी बारदाना बंडल भरून घेऊन निघालेला ट्रक MP13H0435 भरधावं वेगात जात असताना त्या ट्रक मध्ये अचानक आग लागली आणि ती आग आष्टी बस स्टॅन्ड परिसरात आल्यावर गुह सैनिक देवेंद्र मोहोड, अश्विन हराळे, दीपक कुरवाडे, रवींद्र ढोक यांच्या लक्षात येताच आग लागली म्हणून चालकाला ईशारा देत ट्रक बस स्टॅन्ड परिसरात थंबवून मोठा अनर्थ टाळला.

सविस्तर असे कि,

वरुड येथून आर्वी कडे जाणाऱ्या बारदाना बंडल भरून घेऊन वेगात जाणाऱ्या ट्रक ला आष्टी तालुक्यातील तेलाई घाटात लागलेल्या जंगलातील आगितील चिंगारी ही ट्रक मध्ये पडली असावी आणि त्यातून ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. ट्रक मधील बारदाना बंडल हळूहळू पेटत गेले आणि आष्टी बस स्टॅन्ड परिसरात ट्रक आल्यावर त्यातून धूर निघताना दिसला. त्याच वेळी कर्तव्य बजावणाऱ्या चार होम गार्ड ला ट्रक मधील धूर दिसला आणि त्या ट्रक चालकाला ईशारा करीत ट्रक थांबवायला भाग पडून ट्रक मध्ये गुह सैनिक देवेंद्र मोहोळ, अश्विन हराळे, दीपक कुरवाडे, रवींद्र ढोक यांनी ट्रक मध्ये घुसून आतील आग लागलेले बंडल बाहेर काढले. शेजारी हॉटेल मधून पाणी घेऊन आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. चालक व मालक दीपक शेषराव बांद्रे राहणार जलराम वार्ड पांढर्णा मद्य प्रदेश यांनी जीवाची पर्वा न करता आगीत उडी घेऊन पेटलेले बंडल बाहेर काढले. पाणी मिळत नाही हें लक्षात आल्यावर चालकांनी आपले वाहन बँक ऑफ इंडिया जवळ बाराई नामक वाशिंग सेंटर जवळ ट्रक उभा केला. बाराई नामक दोन्हीही बंधूनी जीवापाड मेहनत घेतली आणि स्प्रे पंप आग विझविण्याच्या कमी लावला. त्याच वेळी या घटनेची माहिती ठाणेदार जोशी यांना कळतच त्यांनी अग्निशमन यंत्रणा पाठवून पोलिसांना घटना स्तळी हजर केले. पोलीस कॅन्टेबल सतीश नंदागवळी यांनी जळत्या ट्रक मध्ये उडी घेत आग विझविली. वरून कडक उन्हात सत्तीस नंदागवळी व चालक जीवाची पर्वा न करता आग नियंत्रण करण्यात यश मिळविले. नेमके त्याच वेळी अग्निशमन यंत्रणा सज्ज झाली आणि काही तासात आग विझवून ट्रक सही सलामत मोठया दुर्घटना पासून वाचवीला. या प्रसंगी ठाणेदार राजेश जोशी,पोलीस कॉन्स्टेबल सतीश नंदा गवळी, गुह सैनिक देवेंद्र मोहोड, अश्विन हराळे, दीपक कुरवाडे, रवींद्र ढोक यांचे उपस्थित नागरिकांनी तोंड भरून कौतुक केले. यावेळी संजय दिघेकर, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

आपदा प्रशिक्षण घेऊन आलेले चारही गुह सैनिक बारा दिवस प्रशिक्षण घेऊन नुकतेच आष्टी शहरात दाखलं झाले होते. नेमके त्याच सैनिकांनी संकट समई मोलाची कामगिरी पार पाडली म्हणून त्याचे आष्टी शहरात कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!