हिंगणघाट – /आयुष्यात संघर्ष हे प्रगतीचे लक्षण असते, जो त्याला सामोरे जातो तोच प्रगतीपथावर असतो आणि असाच संघर्षातून मार्ग काढून येथील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) गटाचे महाराष्ट्राचे. सरचिटणीस अतुल वांदिले यांनी बिकट परिस्थितीतून आपली स्वःताची पाऊलवाट तयार केली.
परिणामी आज हिंगणघाट सारख्या छोटयाशा शहरातील एक तरुण नेतृत्व आज राका पक्षनेत्यांच्या गळ्यातील ताईत झालेला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने नाशिक येथे भव्य मोर्चाचे आयोजन दि. 15 सप्टेंबरला केले होते.विशेष म्हणजे यां मोर्चाच्या यशस्वीतेसाठी व अन्य नियोजनासाठी पक्षाने निरीक्षक म्हणून अतुल वांदिले या युवा दमाच्या नेत्यांची निवड करून संपूर्ण जबाबदारी सोपवली अतुल वांदिले यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडीत नाशिक येथील मोर्चा साठी यशस्वी नियोजन केले.व हा मोर्चा पक्ष नेतृत्वाच्या अपेक्षेपेक्षा यशस्वी झाला. यासाठी अतुल वांदिले यांनी सतत बारा दिवस नाशिक जिल्ह्यात ठाण मांडून विविध भागात फिरून कार्यकर्त्यात उत्साह व जोश निर्माण केला. व स्थानिक नेत्यांच्या मदतीने हा मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी केला.
याची दखल राकाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. शशीकांत शिंदे यांनी घेतली व काल दि 28 सप्टेंबरला वांदिले यांना मुंबई येथील पक्ष कार्यालयात बोलावून त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हा एक प्रकारे हिंगणघाटच्या मातीचाच गौरव असल्याची नम्र प्रतिक्रिया अतुल वांदिले यांनी व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्याचे वेळी सर्वश्री माजी आमदार सुनील भुसारा, रवींद्र पवार, व अन्य नेते उपस्थित होते.