फ्लैट स्कीमचे ऑनलाइन ७/१२ लवकरात लवकर सुरू करावेत : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन
वर्धा :- वर्धा जिल्ह्याचे युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक वरुण भाई पांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले आहे. .सन 2016 पासून वर्धा जिल्ह्यात सदनिकाचे ऑनलाईन 7/12 देणे शासनाने बंद केले आहे.त्यामुळे ज्या सदनिकाधारकांनी सदनिका खरेदी केल्या आहेत, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फ्लैट धारकांना फ्लॅट विकायचा असल्यास ऑनलाइन सातबारा नसल्याने रजिस्ट्रार कार्यालयात विक्रीपत्र बनणे शक्य नाही. आज एखाद्याला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, वैद्यकीय आणीबाणीसाठी, कोणत्याही प्रकारच्या लग्नकार्यासाठी किंवा कोणत्याही तातडीच्या कामासाठी आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतील तर तो फ्लॅट विकून आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही. स्वत:ची मालमत्ता असूनही त्याला वेळेवर मालमत्तेचा लाभ मिळत नाही. कोरोनाच्या काळात अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा लोकांना त्यांचा फ्लैट विकून त्यांची परिस्थिती हाताळायची असली तरीही त्यांना त्यांच्या मालकीचा फ्लॅट विकता येत नाही. वर्धा जिल्ह्यात फ्लैट स्कीमचे ऑनलाईन 7/12 उपलब्ध न झाल्याने किंवा देने बंद केल्यामुळे बाजारपेठेतील आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहे.त्याचा परिणाम वर्ध्याच्या अर्थव्यवस्थेवर होत असून आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच शासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान होत आहे.निवेदन देताना वरुण पांडे यांनी पुढे म्हटले आहे की, हा नियमित सातबारा सुरू होईपर्यंत फ्लैट विक्रीसाठी शासनाने काही पर्यायी मार्ग शोधून काढावा, जेणेकरून फ्लैट धारकांना सुटकेचा नि:श्वास सोडता येईल व फ्लैट विकता येतील. सरकारने या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि फ्लैट स्कीम चे ऑनलाइन 7/12 देणे सुरू करावा.त्यावेळी निवेदन देतांना वरुणभाई पांडे, कैलास चुनारकर विनोद महल्ले, शुभम राऊत विश्वभूषण तिवारी यावेळी उपस्थित होते.
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24वर्धा